आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ कियारासोबत राजस्थानात घेणार सप्तपदी:जैसलमेर आणि थार हवेलीत असेल पाहुण्यांचा मुक्काम, भारतातील टॉप 15 वेडिंग डेस्टिनेशनमध्ये सामील

सिकंदर शेखएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

कतरिना-विकी आणि आलिया-रणबीरनंतर आता बॉलिवूडची आणखी एक स्टार जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 2023 मधील बॉलिवूडमधील हे पहिले स्टार वेडिंग असेल. ही जोडी आहे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची. 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हे दोघे आता साताजन्माच्या गाठीत अडकणार आहे.

लग्नाची बातमी समोर येताच चाहते दोघांना वधू-वराच्या रुपात बघण्यासाठी उत्सुक आहेत. या रॉयल वेडिंगचे डेस्टिनेशन देखील अतिशय खास आहे. दोघांनाही भारतातील टॉप 15 वेडिंग डेस्टिनेशनमध्ये सामील असलेली जागा आवडली आहे. हे ठिकाण मुंबईपासून हजारो किलोमीटर अंतरावर राजस्थानमध्ये आहे. हे स्टार कपल 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

कियारा आणि सिद्धार्थने एकाच चित्रपटात एकत्र काम केले आहे. 2022 मध्ये आलेला शेरशाह हा चित्रपट कॅप्टन बत्रा यांच्या जीवनावर बनवण्यात आला होता.
कियारा आणि सिद्धार्थने एकाच चित्रपटात एकत्र काम केले आहे. 2022 मध्ये आलेला शेरशाह हा चित्रपट कॅप्टन बत्रा यांच्या जीवनावर बनवण्यात आला होता.

मॉडेल ते अभिनेता असा प्रवास
सिद्धार्थ मल्होत्राने वयाच्या 18 व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 2010 मध्ये 'माय नेम इज खान' या चित्रपटात करण जोहरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले होते. यानंतर करण जोहरने स्टुडंट ऑफ द इयर (2012) मधून त्याला लाँच केले होते. 2023 मध्ये सिद्धार्थचे अदल बादल, मिशन मंजनू आणि योद्धा हे तीन चित्रपट येत आहेत.

सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या लग्नासाठी सूर्यगड हॉटेलचीच का निवड केली, वाचा...

 • डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण

जैसलमेरचे सूर्यगड हॉटेल शहरापासून 16 किमी अंतरावर सम रोडवर आहे. डिसेंबर 2010 मध्ये जयपूर येथील एका व्यावसायिकाने हे हॉटेल बांधले. सुमारे 65 एकर परिसरात पसरलेले हे हॉटेल जैसलमेरच्या पिवळ्या दगडांनी बनवलेले आहे.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे जगभर प्रसिद्ध आहे. तुम्हाला स्विमिंग पूलसह लग्नासाठी बेस्ट रूम आणि 65 एकर हॉटेलमध्ये लग्नाचे सर्व विधी करण्यासाठी उत्तम जागा मिळेल.

सूर्यगड हॉटेलबाबत सेलिब्रिटींमध्ये खूप क्रेझ आहे.
सूर्यगड हॉटेलबाबत सेलिब्रिटींमध्ये खूप क्रेझ आहे.
 • कियारा-सिद्धार्थ बावडीमध्ये घेणार सप्तपदी

हॉटेलमध्ये लग्नसमारंभासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. हॉटेलचे इंटेरिअर आणि लोकेशन बघून कुणीही त्याच्या प्रेमात पडेल. याच कारणामुळे दोघांनी लग्नासाठी सूर्यगड हॉटेलची निवड केली आहे.

बावडी- हॉटेलमध्ये बावडी नावाची जागा आहे. हे ठिकाण खास लग्न समारंभांसाठी बनवले आहे. मंडपाभोवती चार खांब लावण्यात आले आहेत. कियारा-सिद्धार्थ येथेच सप्तपदी घेतील. हॉटेलमध्ये तलावाच्या बाजूला 2 मोठे गार्डन्स आहेत. जिथे एक हजाराहून अधिक पाहुणे थांबू शकतात.

कियाराला येथे लागणार मेंदी - हॉटेलचे सर्वात मोठे कोर्ट यार्ड संगीत, हळद आणि मेंदीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. लांबच लांब पडद्यांनी उंच इमारती सुशोभित केल्या जातात आणि सर्वत्र पिवळ्या दगडांनी बनवलेल्या कोरीव जाळ्या आहेत. येथे रात्रीच्या जेवणासाठी प्रति व्यक्ती 15 हजार रुपये आकारले जातात. या ठिकाणी स्टार कपलचे लग्नाचे सोहळे होणार आहेत.

बावडी येथील मंडप एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या भव्य सेटप्रमाणे आहे. मंडपाभोवती पाहुण्यांसाठी बसण्यासाठी भारतीय बैठक आहे.
बावडी येथील मंडप एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या भव्य सेटप्रमाणे आहे. मंडपाभोवती पाहुण्यांसाठी बसण्यासाठी भारतीय बैठक आहे.

दिवसाला 2 कोटी येतो खर्च
हॉटेलमध्ये बहुतेक शाही विवाहसोहळे आयोजित केले जातात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात अल्कोहलव्यतिरिकत एका दिवसाचा खर्च सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे. दुसरीकडे, ऑक्टोबर ते मार्च या पर्यटन हंगामातील बुकिंगसाठी दररोज सुमारे दोन कोटी रुपये आकारले जातात.

2 लाखांपर्यंत एका खोलीचे भाडे
किल्ल्याच्या इमारतीमध्ये सुंदर दगडी कोरीवकाम तसेच आलिशान आतील इंटेरिअर आहे. हॉटेलमध्ये पाहुण्यांचे राजस्थानी शैलीत स्वागत केले जाते. पिवळ्या दगडांनी बनवलेल्या हॉटेलमध्ये 3 कॅटेगरीत खोल्या उपलब्ध आहेत, ज्याचे एका दिवसाचे भाडे 20 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच पाहुण्यांसाठी विविध सुविधा आहेत.

हॉटेल या खास गोष्टी

 • 84 खोली
 • 92 बेडरूम
 • 2 मोठे गार्डन
 • एक कृत्रिम तलाव
 • जिम
 • बार
 • इनडोअर स्विमिंग पूल
 • 5 मोठे व्हिला
 • 2 मोठे रेस्तराँ
 • इनडोअर गेम्स
 • हॉर्स रायडिंग
 • मिनी प्राणीसंग्रहालय
 • सेंद्रिय बाग
बॉलिवूडचे अनेक स्टार्स या हॉटेलमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येतात.
बॉलिवूडचे अनेक स्टार्स या हॉटेलमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येतात.
 • लक्झरी खोल्या 3 कॅटेगरीत विभागल्या आहेत

हॉटेल सूर्यगडमध्ये एकूण 84 खोल्या आणि सुमारे 92 बेडरूम आहेत. येथे खोली 3 कॅटेगरीत विभागल्या गेल्या आहेत. बेस श्रेणीमध्ये फोर्ट रूम, हेरिटेज आणि पॅव्हेलियन यांचा समावेश होतो. दुस-या कॅटेगरीत सिग्नेचर, लक्झरी आणि सुर्यगड सुइट्स सूट रूम आहेत. तिसर्‍या कॅटेगरीत 5 व्हिला आहेत, त्यापैकी 3 जैसलमेर हवेलीच्या नावावर आहेत आणि 2 थर हवेलीच्या नावावर आहेत.

बेस कॅटेगरी

फोर्ट रूम - खोली 250 स्क्वेअर फूटमध्ये बांधली आहे. एका दिवसाचे भाडे 20,000 रुपये प्लस टॅक्स आहे.

हेरिटेज रूम - हेरिटेज रूम फोर्ट रूमपेक्षा मोठी आहे. एका दिवसाचे भाडे 25 ते 30 हजार रुपये प्लस टॅक्स आहे.

पॅव्हेलियन रूम - हे सर्व आधुनिक सुविधांसह तळमजल्यावर आहे. त्याचे भाडे 20-25 हजार रुपये प्लस टॅक्स आहे.

सुइट कॅटेगरी (एका दिवसाचे भाडे)

सिग्नेचर सूइट - या सूइटमध्ये 1 ड्राइंग एरियाचा समावेश आहे. भाडे 18-35 हजार रुपये प्लस टॅक्स आहे.

लक्झरी सूइट - 1 ड्रॉइंग रूम, 2 लोकांसाठी डायनिंग चे टेबल. टॅक्ससह भाडे 45 ते 50 हजार रुपये आहे.

सूर्यगड सूइट - 1300 ते 1400 चौरस परिसरात बांधला आहे. टेरेसवर 1 ड्रॉइंग रूम, 1 बेड रूम, जकूझी बाथ टब आणि खासगी स्विमिंग पूल देखील आहे.

लक्झरी सूइटमध्ये 1 ड्रॉइंग रूम आणि 2 लोकांसाठी स्वतंत्र डायनिंग टेबल देखील आहे.
लक्झरी सूइटमध्ये 1 ड्रॉइंग रूम आणि 2 लोकांसाठी स्वतंत्र डायनिंग टेबल देखील आहे.

हॉटेलच्या मागे 5 व्हिला बांधले

हॉटेल सूर्यगडच्या मागील बाजूस 5 स्वतंत्र व्हिला आहेत. व्हिला दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. जैसलमेर हवेली (5) आणि थार हवेली (2)

जैसलमेर हवेली - हॉटेल सूर्यगडमध्ये होम फिलिंगसाठी 3 जैसलमेर हवेली (व्हिला) बांधल्या आहेत. प्रत्येक हवेलीत दोन स्वतंत्र खोल्या आहेत. स्विमिंग पूल बांधले गेले आहेत आणि सर्व लक्झरी सुविधा एका हवेलीत आहेत. त्याचे एका दिवसाचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत आहे.

थार हवेली - 2 थार हवेली आहे, ज्यामध्ये 3 खोल्या आहेत. स्विमिंग पूलसह एक स्वतंत्र जेवणाचे खोली देखील आहे. या हवेलीचे भाडे सुमारे दोन लाख रुपये आहे.

राजस्थानच्या शाही ग्लॅमरची अनुभूती देणारे, हे व्हिला सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
राजस्थानच्या शाही ग्लॅमरची अनुभूती देणारे, हे व्हिला सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

हॉटेलमध्ये दोन गार्डन्समध्ये कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत. लांब विस्तीर्ण असलेल्या या तलावात नैसर्गिक पावसाचे पाणी जमा होते. बहुतेक पार्ट्या या तलावाच्या बाजूला होतात.

 • जागतिक दर्जाचा स्पा, आणि आखाडा नावाची जिम

हॉटेलमध्ये एक मोठा इनडोअर हीटेड स्विमिंग पूल आहे. 'नील' असे या तलावाचे नाव आहे. या हीटेड स्विमिंग पूलमध्ये गरम पाण्याची सोय आहे. अतिथी हिवाळ्यातही आरामात पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. यासोबतच सँड नावाचा जागतिक दर्जाचा स्पा, आखाडा नावाची जिमही आहे. ज्यामध्ये पाहुण्यांना सर्व प्रकारच्या मशीन व्यायामाची सुविधा मिळते. ताश नावाची इनडोअर गेम्स रूम देखील आहे. ज्यामध्ये तुम्हाला पत्ते आणि बिलियर्ड गेम खेळायला मिळतात. हॉटेलमध्ये द्राक्ष नावाचा बार देखील आहे, जिथे तुम्हाला देशातील आणि जगातील सर्वात महागडी दारू मिळेल.

 • राजस्थानी जेवणासाठी वेगळे रेस्तराँ

हॉटेलमध्ये 2 रेस्तराँ आहेत. लिजेंड्स ऑफ मारवाड आणि नोश नावाच्या रेस्तराँमध्ये पाहुण्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जातात.

लिजेंड्स ऑफ मारवाड - या रेस्तराँमध्ये फक्त रात्रीचे जेवण होते. ज्यामध्ये फक्त राजस्थानी व्हेज आणि नॉनव्हेज जेवण दिले जाते.

नोश- नोश नावाचे रेस्तराँ मल्टी कुशन रेस्तराँ आहे. यामध्ये तुम्हाला लंच आणि डिनर दोन्ही उपलब्ध होते. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थांचा यात समावेश असतो.

सूर्यगड पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या यादीत ते अनेकदा आघाडीवर असते.
सूर्यगड पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या यादीत ते अनेकदा आघाडीवर असते.
 • ऑर्गेनिक गार्डन, मिनी प्राणीसंग्रहालय आणि घोडेस्वारी

हॉटेलमध्ये बनवल्या जाणार्‍या सॅलडमध्ये वापरल्या जाणारा भाजीपाला रसायनांचा वापर न करता येथे 100% सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. यासोबतच लहान मुलांसाठी प्राणीसंग्रहालयही आहे. या मिनी प्राणीसंग्रहालयात पाळीव प्राणी आणि पक्षी ठेवण्यात आले आहेत. पाहुण्यांसाठी घोडेस्वारीचीही सोय आहे जी येथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी मोफत आहे. या तलावाच्या बाजूला 3 घोडे घोडेस्वारी उपलब्ध असतात.

 • लेकसाइड आणि सेलिब्रेशन नावाचे गार्डन

फंक्शन्ससाठी 2 मोठी उद्याने आहेत. या दोन्ही गार्डनमध्ये फंक्शन होतात. म्हणूनच त्यांची नावे देखील थोडी हटके आहेत. लेक साइड आणि सेलिब्रेशन ही त्यांची नावे आहेत. दोन्ही ठिकाणी सुमारे 350 ते 400 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. हॉटेलमध्ये दररोज संध्याकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम असतो. पाहुण्यांसाठी एक दिवस सुफी आणि एक दिवस राजस्थानी लोकगीते सादर केली जातात. हे सर्व कार्यक्रम सनसेट पॅटिओ गार्डनमध्ये होतात.

हा एक इनडोअर हीटेड स्विमिंग पूल आहे, ज्यामध्ये हिवाळ्यात कोमट पाण्यात आरामात पोहण्याचा आनंद घेता येतो.
हा एक इनडोअर हीटेड स्विमिंग पूल आहे, ज्यामध्ये हिवाळ्यात कोमट पाण्यात आरामात पोहण्याचा आनंद घेता येतो.
 • फिल्म स्टार्स आणि राजकीय नेत्यांची पहिली पसंती

सूर्यगड हॉटेल हे फिल्म स्टार्सच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. अक्षय कुमार, सलमान खान, करण जोहर, शाहरुख खानची पत्नी गौरी खान, फराह खान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

'हाऊसफुल 4' आणि 'रेस 3' या चित्रपटांचे बहुतांश शूटिंग याच हॉटेलमध्ये झाले आहे. अनेक मोठे औद्योगिक घराणे तसेच अनिवासी भारतीय देखील लग्नाला शाही बनवण्यासाठी चार्टर घेऊन येतात. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनीही येथे एका लग्नाला हजेरी लावली होती.

राजकीय नेत्यांबद्दल बोलायचे झाले तर वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान यांच्यापासून अनेक मंत्री आणि बडे नेते जैसलमेरला येतात तेव्हा इथेच मुक्काम करतात. राजस्थान प्रदेश काँग्रेसमधील बंडखोरीदरम्यान अशोक गेहलोत यांचे सरकार येथे 14 दिवस राहिले होते.

हे सेलिब्रेशन गार्डन आहे, ज्यामध्ये लग्नाचे कार्यक्रम होतात. हॉटेलमध्ये दररोज संध्याकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम असतो.
हे सेलिब्रेशन गार्डन आहे, ज्यामध्ये लग्नाचे कार्यक्रम होतात. हॉटेलमध्ये दररोज संध्याकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम असतो.
 • हॉटेलला अनेक पुरस्कार मिळाले आहेत

गेल्या वर्षी हॉटेल सूर्यगडला रीडर्स चॉईस पुरस्कार मिळाला आहे. देशातील 15 सर्वोत्कृष्ट हॉटेल्समध्ये जैसलमेरच्या हॉटेल सूर्यगडला ट्रॅव्हल मॅगझिन कॉन्ड नॅस्ट ट्रॅव्हलरच्या 2021 च्या रीडर्स चॉईस अवॉर्ड्सच्या यादीत 6 वे स्थान प्राप्त झाले होते. अतुलनीय आदरातिथ्य, भव्य वैभव आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा या पॅरामीटर्सवर हे रँकिंग जारी करण्यात आले होते. 2010 मध्ये बांधलेल्या या हॉटेलने आपल्या सौंदर्य आणि आदरातिथ्यासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

 • 2014 मध्ये कोंडे नास्ट ट्रॅव्हलरचे सर्वोत्कृष्ट बँक्वेट हॉटेल उपविजेते.
 • 2015 आणि 2016 मध्ये, ट्रिप अॅडव्हायझरने सूर्यगडला देशातील टॉप 10 हॉटेल्समध्ये ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड दिला.
 • 2015 बुटीक हॉटेल पुरस्कारांमध्ये आशियातील सर्वोत्तम बुटीक हॉटेल.
 • 2019 मध्ये ट्रॅव्हल अँड लीझरचा सर्वोत्कृष्ट बुटीक हॉटेल पुरस्कार.
 • 2019 मधील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक स्टँड अलोन रेस्तराँसाठी इंडियन रेस्तराँ काँग्रेस पुरस्कार.
 • 2021 मध्ये, ट्रॅव्हल मॅगझिन कॉन्ड नस्ट ट्रॅव्हलरने अतुलनीय आदरातिथ्य, भव्य वैभव आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी वाचकांच्या पसंतीच्या पुरस्कारांच्या यादीत सूर्यगडला देशात सहावे स्थान दिले.

फोटोंमध्ये पहा स्टार कपलचे वेडिंग डेस्टिनेशन...

जैसलमेरच्या पिवळ्या दगडांनी बनलेली ही इमारत रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात खूप सुंदर दिसते.
जैसलमेरच्या पिवळ्या दगडांनी बनलेली ही इमारत रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात खूप सुंदर दिसते.
दररोज संध्याकाळी, कल्चर नाईट सनसेट पॅटिओ गार्डनमध्ये होते. एक दिवस सुफी आणि एक दिवस राजस्थानी लोकगीतांचा कार्यक्रम असतो.
दररोज संध्याकाळी, कल्चर नाईट सनसेट पॅटिओ गार्डनमध्ये होते. एक दिवस सुफी आणि एक दिवस राजस्थानी लोकगीतांचा कार्यक्रम असतो.
पाहुण्यांसाठी वाळवंटात जेवणाची व्यवस्था. ही सुविधा हॉटेल मागणीनुसार पुरवते.
पाहुण्यांसाठी वाळवंटात जेवणाची व्यवस्था. ही सुविधा हॉटेल मागणीनुसार पुरवते.
हॉटेलमध्ये दोन मोठ्या बागा, सर्वत्र झाडे आहेत.
हॉटेलमध्ये दोन मोठ्या बागा, सर्वत्र झाडे आहेत.
तटबंदीच्या इमारतीमध्ये सुंदर दगडी कोरीवकाम तसेच आलिशान इंटेरिअर आहे. हॉटेलमध्ये पाहुण्यांचे राजस्थानी शैलीत स्वागत केले जाते.
तटबंदीच्या इमारतीमध्ये सुंदर दगडी कोरीवकाम तसेच आलिशान इंटेरिअर आहे. हॉटेलमध्ये पाहुण्यांचे राजस्थानी शैलीत स्वागत केले जाते.

हेही वाचा...

 • बॉयफ्रेंड सोहेलसोबत बोहल्यावर चढली हंसिका:एका क्लिकवर बघा लग्न, हळद आणि मेंदी सोहळ्याचे खास फोटो

बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी रविवारी बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत विवाहबंधनात अडकली. राजस्थानच्या जयपूरमधील ऐतिहासिक मुंडोता किल्ल्यावर दोघे साताजन्माच्या गाठीत अडकले. हंसिका रेड ब्राइडल लेहेंग्यात दिसली. तर सोहेलने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर...

 • हंसिका लग्न करत असलेल्या 450 वर्षे जुन्या फोर्टची झलक:बिझनेसमनसोबत घेणार सप्तपदी; वॉर सूइटमध्ये असेल मुक्काम

राजस्थान आता जगभरातील पर्यटकांसह बॉलिवूड कलाकारांचे आवडते डेस्टिनेशन बनत आहे. चित्रपटांच्या शूटिंगसोबतच बॉलिवूड कलाकार राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीही जयपूरच्या मुंडोता फोर्ट आणि पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...