आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rhea Chakraborty Siddharth Pithani News | Sushant Death Case Update | Siddharth Pithani Admitted That Rhea Chakraborty Deleted Sushant Singh Rajput's 8 Hard Drives Data

रियाने पुरावे नष्ट केले का?:सुशांतचे घर सोडण्यापूर्वी रियाने 8 हार्ड डिस्कचा डेटा डिलीट केला होता; सुशांतचे कौटुंबिक वकील म्हणाले - हत्येचा कट रचला जात होता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तानुसार, सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशीत डेटा डिलीट केल्याचा खुलासा केला.
  • ड्रग प्रकरणात रियासह 5 जणांची नार्कोटिक्स ब्युरो लवकरच चौकशी करणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे होते आहेत. मीडिया रिपोर्टनुसार रियाने सुशांतचे घर सोडण्यापूर्वी आयटी प्रोफेशनलला कॉल करून 8 हार्ड डिस्कमधून डेटा डिलीट केला होता. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशीत हा खुलासा केला आहे. दुसरीकडे सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले आहे की, डेटा डिलीट केल्याचे जर खरे असेल तर सुशांतला ठार मारण्याचे षडयंत्र रचल्याचे स्पष्ट होईल.

रिपोर्ट्सनुसार, डेटा डिलीट करताना सुशांत तिथे हजर असल्याचे सिद्धार्थ पिठाणीने चौकशीदरम्यान सांगितले आहे. डेटा डिलीट करण्यावर सुशांतचा आक्षेप नसल्याचेही तो म्हणाला आहे. या 8 हार्ड डिस्कमधून कोणता कंटेट होता, हे सिद्धार्थने सांगितलेले नाही. आता सीबीआय याचा शोध घेईल. 8 जून रोजी रिया सुशांतच्या घरातून बाहेर पडली होती.

  • हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाचा पर्सनल डेटा असू शकतो

8 जूनच्या रात्री रियाने तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलावले. यानंतर दोघांनी 3 सुटकेसमध्ये सामान पॅक केले आणि रियाने सुशांतचा फ्लॅट सोडला. याची पुष्टीही इमारतीच्या चौकीदाराने केली असून त्याला सीबीआयने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते. असे म्हटले जात आहे की, डिलीट केलेल्या डेटामध्ये रिया आणि सुशांतचे वैयक्तिक व्हिडिओ आणि छायाचित्रे असू शकतात. तथापि, याची पुष्टी झालेली नाही.

  • रियावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे

ईडीनंतर सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) देखील रियासह पाच जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. रियासह सुशांतचा हाऊस मॅनेजरसॅम्युअल मिरांडा, बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, जया साहा आणि अन्य एका जणाविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीची टीम लवकरच रिया आणि इतर आरोपींची चौकशी करू शकेल.

  • रियाच्या चॅटमध्ये एकाला फसव्या पद्धतीने ड्रग्ज दिल्याचा उल्लेख आहे

रियाच्या व्हॉट्सअॅप चॅट ईडीला मिळाले आहेत. यात ती हार्ड ड्रग एमडीएमएबद्दल बोलली आहे. हे ड्रग बहुतेकदा मुंबईतील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये वापरले जाते. सॅम्युअल मिरांडाने रियाला चॅट पाठवला होता - हाय रिया, स्टफ जवळजवळ संपला आहे. तर एका चॅटमध्ये जया साहाने रियाला लिहिले आहे - पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये 4 थेंब घाल आणि त्याला दे. मग यास 40 मिनिटे लागतील.