आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्हाला आमिर खानचा रंग दे बसंती चित्रपट लक्षात असेल तर तुम्हाला सिद्धार्थला ओळखले असेल. याने पहिले सायना नेहवालवर सेक्सिस्ट कमेंट केली आणि आता सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणतोय की, त्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि वाद वाढवण्यात आला. त्यांनी काहीच अपमानजनक बोलले नव्हते आणि कुणाकडे इशाराही केला नव्हता.
या संपूर्ण प्रकरणाविषयी राष्ट्रीय महिला आयोगाने देखील अभिनेता सिद्धार्थला ट्विटवर नोटीस पाठवली आहे.
इथून प्रकरणाला सुरुवात झाली
सायनाने तिच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींचा निषेध केला होता. तिने लिहिलं आहे की, जर स्वत:च्या पंतप्रधानाच्या सुरक्षेशी तडजोड केली असेल तर कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते
सिद्धार्थला प्रचंड ट्रोल करण्यात आले
सायनाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणाऱ्या सिद्धार्थवर युजर्सनी जोरदार टीका केली. सिद्धार्थ केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूलाच लक्ष्य करत नाही, तर स्वतःचा विरोद व्यक्त करण्यासाठी लैंगिक अपमानास्पद भाषा वापरत आहे असे म्हणत यूजर्स नाराज झाले. एका यूजरने लिहिले - तर ट्विटर इंडियाने एक-दोन कौडीच्या अॅक्टरला ब्लू टिक दिली आहे, जो एक स्पोर्ट्स आयकॉनवर अश्लील कमेंट करतो आणि बोलले जाते की, ट्विटर महिलांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा सिद्धार्थ सायकोने असे केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.