आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघे 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान या पॅलेसमध्ये दोघांचे लग्नाचे विधी पार पडणार आहेत. दरम्यान, बॉलिवूडच्या प्रसिद्ध मेंदी कलाकार वीणा नागदा यादेखील राजस्थानमध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावरून त्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
वीणा नागदा यांनी सोशल मीडियावर फोटो आणि हॅशटॅगसह लिहिले की, त्या बिगफॅट इंडियन वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राजस्थानला जात आहे. राजस्थानला पोहोचल्यानंतरही त्यांनी तेथील एक फोटोदेखील पोस्ट केला आहे.
सून कियारासाठी सिद्धार्थचे कुटुंब करत आहेत विशेष प्लानिंग
ETimesच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्राचे कुटुंब त्यांची भावी सून कियारासाठी खास योजना आखत आहे. सिद्धार्थचे कुटुंब कियारासाठी एका खास संगीत कार्यक्रमाची तयारी करत आहे.
सिद्धार्थच्या कुटुंबातीलच एका सदस्याने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. सिद्धार्थ आणि कियारा एकत्र रोमँटिक डान्स परफॉर्मन्स देणार असल्याचेही म्हटले जात आहे.
3 फेब्रुवारीला मुंबईहून जैसलमेरला रवाना होत आहे सुरक्षा रक्षकांची टीम
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासीन युगल याच्यावर सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. 3 फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांची टीम मुंबईहून जैसलमेरला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन, शाहिद कपूर-मीरा राजपूत आणि ईशा अंबानीसह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नापूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लग्नस्थळाच्या आजुबाजुलाही कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
पाहुण्यांसाठी आलिशान व्यवस्था केली जात आहे
सिद्धार्थ आणि कियारा लग्न करत असलेल्या सूर्यगड पॅलेसचे दररोजचे भाडे एक ते दोन कोटी रुपये आहे. यासोबतच पाहुण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जैसलमेरमध्ये लग्नानंतर मुंबईत एक ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले जाणार आहे. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
'शेरशाह'नंतर सुरु झाली प्रेमकहाणी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रेमकहाणी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम करत असताना सुरू झाली. 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि नंतर एकमेकांना डेट करू लागले. 'शेरशाह'मध्ये दोघांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता.
सिद्धार्थच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. तर कियारा कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा'मध्ये झळकणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. आता या पॅलेसनेही या लग्नाची पुष्टी केली असून हा भव्य विवाहसोहळा 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान या पॅलेसमध्ये होणार आहे. यासोबतच शाहरुख खानच्या एक्स बॉडीगार्डवर या भव्य लग्नाची सुरक्षा व्यवस्था सोपवण्यात आली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या ग्रॅण्ड लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. हा एक खासगी विवाहसोहळा असून यात फक्त 100-125 पाहुणे सहभागी होणार आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.