आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ-कियाराचे लग्नाचे ठिकाण ठरले:चंदीगडमध्ये होऊ शकतो लग्नसोहळा, दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा केला जातोय की या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे ठिकाण ठरवले आहे. दोघेही चंदीगडमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढेच नाही तर मल्होत्रा ​​आणि अडवाणी कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल असे म्हटले जात आहे.

लग्न समारंभासाठी 2 ठिकाणे निवडली
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सिड-कियाराने लग्नासाठी चंदीगडच्या ओबेरॉय सुखविलास हॉटेलची निवड केल्याचे समोर आले आहे. चंदिगड हे दिल्लीच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबासाठी ते सोयीचे असेल. लग्नानंतर दोघांचे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईत होणार आहे.

जोडप्याच्या निकटवर्तीयाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावले
खरं तर, काही काळापूर्वी मीडियाशी संवाद साधताना कियारा-सिद्धार्थच्या कॉमन फ्रेंडला हे दोघे जानेवारीत लग्न करणार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो मित्र म्हणाला- मला वाटत नाही की दोघांनी अजून लग्नाचा विचार केला आहे, या सगळ्या फक्त अफवा आहेत. सध्या कियाराच्या करिअरची उत्कृष्ट फेज सुरु आहे, अशा परिस्थितीत लग्नाचा विचार तिच्या करिअरला ब्रेक लावू शकतो, असे या मित्राने म्हटले होते.

करणच्या शोमध्ये शाहिदने दिले होते लग्नाचे संकेत
काही काळापूर्वी शाहिद आणि कियारा 'कॉफी विथ करण' या शोमध्ये पोहोचले होते. यावेशी शाहिदने संकेत दिला होता की कियारा अडवाणी वर्षाच्या अखेरीस मोठी घोषणा करू शकते. ही घोषणा एखाद्या प्रोजेक्टबद्दल नसून खासगी आयुष्याबद्दल असेल अशी हिंट शाहिदने यावेळी दिली होती. त्यावरुन कियारा आणि सिद्धार्थ लवकरच लग्न करू शकतात असा अंदाज वर्तवला जाऊ लागला. तेव्हापासून, चाहते या कपलच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

कियाराने 2014 मध्ये केली करिअरला सुरुवात
कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'शेरशाह', 'भूल भुलैया 2', 'जुग जुग जिओ' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकली. कियाराच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा', 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

  • सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील पाहुण्यांची यादी फायनल:करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश, पुढील वर्षी होऊ शकतो लग्नसोहळा

बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी पाहुण्यांच्या यादीवर काम सुरू केले आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला बी-टाऊनचे अनेक सेलिब्रिटी आणि फिल्ममेकर्स उपस्थित राहणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या काही निर्माता आणि दिग्दर्शक मित्रांच्या खूप जवळ आहेत आणि ते त्यांना लग्नासाठी आमंत्रित करण्याचा विचार करत आहेत. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...