आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता सेलिब्रिटी टॅरो कार्ड रीडर दिव्या पंडित यांनी लग्नाआधी दोघांसाठी भविष्य वर्तवले आहे. दिव्या यांच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ आणि कियारा लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस देखील असणार आहे.
दिव्या यांनी सांगितल्यानुसार, सिद्धार्थ आणि कियारा दोघेही खूप साधे आहेत, त्यामुळेच त्यांचे लग्न दीर्घकाळ टिकेल. दिव्यानुसार, कियारा सिद्धार्थसाठी एक चांगली आणि लकी पत्नी सिद्ध होईल.
कियारामध्ये आदर्श पत्नी आणि आईचे गुण
इंडिया टुडेशी संवाद साधताना दिव्या म्हणाल्या, 'सिद्धार्थ हा खूप समंजस व्यक्ती आहे. त्यामुळे त्याचे आयुष्यात स्थिरता असेल. तर कियारामध्ये आदर्श पत्नी आणि आईचे गुण आहेत. ती एक चांगली व्यक्तीदेखील आहे. कियाराला सिद्धार्थच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.'
सिद्धार्थने अतिविचार टाळावा
टॅरो कार्ड रीडर दिव्या पंडित म्हणाल्या, 'सिद्धार्थने अतिविचार टाळावा. दुसरीकडे कियारानेदेखील स्वत:मध्ये काही बदल घडवून आणले पाहिजेत. त्यांच्या आयुष्यात सध्या जे बदल होत आहेत, त्याचा दोघांनी आनंद घ्यावा.'
सुरू झाल्या आहेत लग्नाच्या विधी
5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नस्थळी पाहुणे पोहोचत आहेत. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा, करण जोहर आणि आकाश अंबानी रविवारी जैसलमेरमध्ये दाखल झाले. मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी कियाराची बेस्ट फ्रेंड असून ती पती आनंद पिरामलसोबत जैसलमेरला पोहोचली आहे.
लग्नासाठी नटला सूर्यगड पॅलेस
कियारा-सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसची निवड केली आहे. देशातील आघाडीच्या वेडिंग डेस्टिनेशनमध्ये समाविष्ट असलेल्या या पॅलेसच्या 80 खोल्या चार दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. त्याचे रोजचे भाडे एक ते दोन कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
यासोबतच पाहुण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यू यासह सुमारे 70 ते 100 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नासाठी सूर्यगड पॅलेसला नववधूप्रमाणे नटवण्यात आले आहे.
'शेरशाह'नंतर सुरु झाली प्रेमकहाणी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची लव्ह स्टोरी 2021 मध्ये आलेल्या 'शेरशाह' या चित्रपटात एकत्र काम करत असताना सुरू झाली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. शेरशाह या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता.
सिद्धार्थच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे झाले तर तो रोहित शेट्टींच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. तर कियारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा'मध्ये झळकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.