आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला 100 पाहुण्यांची असेल उपस्थिती:आलिशान पॅलेसमध्ये 80 खोल्या बुक, 70 कारचीही व्यवस्था

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या ग्रॅण्ड लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. हा एक खासगी विवाहसोहळा असून यात फक्त 100-125 पाहुणे सहभागी होणार आहेत.

अमिताभ बच्चन ते ईशा अंबानी या लग्नाला हजेरी लावणार आहेत
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडपासून इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन आणि ईशा अंबानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कियारा आणि शाहिद खूप जवळचे मित्र आहेत. यासोबत कियारा-सिद्धार्थ त्यांच्या बालपणीच्या मित्रांनाही लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

सूर्यगड पॅलेसच्या 80 खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत

जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी एक लक्झरी व्हिला बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात सुमारे 80 खोल्या आहेत. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली असून, लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व सोहळे पॅलेसमध्येच ठेवण्यात येणार आहेत. या पॅलेसमधील लग्नासाठी दररोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे.

लग्नानंतर मुंबईत होणार आहे ग्रँड वेडिंग रिसेप्शन
या जोडप्याशी संबंधित एका सूत्राने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, सिद्धार्थ आणि कियारा यांचे प्री-वेडिंग फंक्शन 4 आणि 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लग्नाच्या दिवशीच त्यांचा हळदी आणि संगीत सोहळाही होणार आहे. जैसलमेरमध्ये लग्नानंतर हे जोडपे मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.

सिद्धार्थ दिल्लीत लग्नाच्या तयारीला देत आहेत पर्सनल टच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ स्वतः जातीने हजर राहून लग्नाच्या अंतिम तयारीचा आढावा घेतोय. यासाठी तो सध्या दिल्लीत आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ काही दिवसांतच लग्नासाठी दिल्लीहून आई-वडील आणि जवळच्या कुटुंबीयांसह राजस्थानला पोहोचेल. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...