आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ मल्होत्रा जखमी:‘मिशन मजनू’च्या सेटवर सिद्धार्थच्या गुडघ्याला दुखापत, विश्रांती न घेता पूर्ण करतोय चित्रीकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ विश्रांती न घेता पुढचे तीन दिवस चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे.

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे. लखनऊ येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच चित्रपटातील एक स्टंट सीन शूट करताना सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला मार लागला आहे. सिद्धार्थ चित्रपटाचे दिग्दर्शक शांतनू बागची आणि अॅक्शन डायरेक्टर रवी वर्मा यांच्या मार्गदर्शनात हा स्टंट सीन शूट करत होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिशन मजनू’ या चित्रपटातील स्टंट सीन शूट करताना उडी मारल्यानंतर सिद्धार्थचा पाय एक मेटलच्या तुकड्यावर जाऊन आदळला. त्यामुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. गुडघ्यावर सूज येऊनदेखील सिद्धार्थने चित्रीकरण थांबवले नाही. त्याने औषधे घेऊन उर्वरीत सीन शूट केला.

इतकेच नाही तर सिद्धार्थ विश्रांती न घेता पुढचे तीन दिवस चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. जेणेकरुन ठरलेल्या शेड्युुलमध्ये चित्रीकरण पूर्ण होईल. या चित्रपटात सिद्धार्थसह प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 1970 मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. यात सिद्धार्थ एका रॉ एजेंटची भूमिका साकारणार असल्याचे समजते.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, 'मिशन मजनू'शिवाय तो 'थँक गॉड' आणि 'शेरशाह' या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. 'थँक गॉड'मध्ये रकुल प्रीत सिंह तर 'शेरशाह'मध्ये किआरा आडवाणीसोबत सिद्धार्थ स्क्रिन शेअर करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...