आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ-किआराचे नाते ऑफिशिअल होणार:सिद्धार्थ मल्होत्रासोबत किआरा आडवाणीची लंच डेट, कुटुंबीय होते सोबत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा आडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा ब-याच काळापासून रंगतेय, पण अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अलीकडेच सिद्धार्थ आणि किआरा मुंबईत लंच डेटला एकत्र दिसले. विशेष म्हणजे यावेळी सिद्धार्थचे आईवडीलदेखील त्यांच्यासोबत होते. त्यामुळे सिद्धार्थने आईवडिलांसोबत किआराची ओळख करुन दिली, असा तर्क लावला जातोय. मात्र, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सिद्धार्थच्या एका फॅनपेजवर सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शहा यांनी लंच डेटवेळी क्लिक केलेला दोघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

अक्षय कुमारने दिली होती हिंट
काही दिवसांपूर्वीच किआरा अक्षय कुमारसोबत विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी कपिलने तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. मात्र तिने त्याचे उत्तर देणे टाळले होते. पण अक्षय कुमारने बोलण्याबोलण्यात सिद्धार्थच्या नावाच्या उल्लेख केला होता. किआरा सिद्धांतावर चालणारी मुलगी आहे, असे अक्षय म्हणाला होता. त्यावेळी किआरा लाजताना दिसली होती.

काही दिवसांपूर्वी किआराने सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा अनसीन व्हिडिओदेखील पोस्ट केला होता. तो व्हिडिओ मालदीवचा असल्याचे म्हटले गेले होते. दोघेही न्यू इयर सेलिब्रेशन करुन परतत असताना मुंबई विमानतळावरही एकत्र दिसले होते.