आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेझॉन प्राईम व्हिडियोतर्फे अमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या प्रीमिअरची आज घोषणा करण्यात आली. कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत निर्मिती करण्यात आलेल्या या युद्धनाट्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘शेरशाह’ हा बॉलिवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असेल. भारत आणि जगभरातील 240 हून देशांमधील आणि प्रदेशांमधील चाहत्यांना हा रोमांचक चित्रपट 12 ऑगस्ट पासून केवळ अमेझॉन प्राईम व्हिडियोवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून 1999 सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपले ‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.
“या देशाच्या मातीत रुजलेल्या, फुललेल्या आणि जगभरातील प्रेक्षकांना आपल्या वाटणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सांगण्यास अमेझॉन प्राइम व्हिडियोमध्ये आम्ही प्रयत्नशील असतो.”, असे अमेझॉन प्राईम व्हिडियो, इंडियाचे संचालक आणि कंटेन्ट विभागाचे प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले.
धर्मा प्रोडक्शन्सचे करण जोहर म्हणाले, ‘शेरशाह’ ही युद्धात शौर्य गाजविलेल्या युद्धनायकाची कथा आहे. त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आणि शौर्यामुळे आपल्या देशाने विजयश्री खेचून आणली. त्यांनी केलेले बलिदान अनमोल आहे आणि त्यांचा जीवनपट येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. या चित्रपटरूपी हिऱ्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या रूपाने आम्हाला खऱ्या अर्थाने एक कोंदण सापडल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि त्यांच्यासोबतच्या आमच्या नात्याच्या एका नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. ‘शेरशाह’ ही आपल्या सैनिकांना दिलेली मानवंदना आहे आणि हा चित्रपट पाहून प्रत्येक प्रेक्षकाची छाती अभिमाने फुलून येईल, अशी मला आशा आहे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.