आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची क्रेझ त्याच्या निधनानंतरही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत तिळमात्र कमी झालेली नाही. त्याच्या हत्येच्या साडेदहा महिन्यांनंतर मूसेवालाचे यूट्यूबवरील सब्सक्राइबर्स नऊ लाखांनी वाढले आहेत. एवढेच नाही तर 4 दिवसांपूर्वी रिलीज झालेले 'तेरा नां' हे गाणे 23.6 मिलियन (2 कोटींहून अधिक) लोकांनी ऐकले आहे. रिलीज झाल्यापासून हे गाणे यूट्यूबवर नंबर-1 वर ट्रेंड करत आहे.
29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सिद्धू मूसेवालाबद्दल लोकांची सहानुभूती एवढी वाढली की, निधनानंतर काही दिवसांतच त्याचे सब्सक्राइबर 11 मिलियन झाले होते. मूसेवालाच्या निधनानंतर साडे दहा महिन्यांत त्याची SYL आणि VAAR ही दोन गाणी रिलीज करण्यात आली. तिसरे गाणे लाँच होताच, सिद्धू मूसेवालाच्या सब्सक्राइबर्सचा आकडा 20 मिलियन पार झाला आहे.
हा आकडा सलमान खान, ए.आर. रहमान आणि दिलजीत दुसांजच्या यूट्यूब सब्सक्राइबरपेक्षा 6 पट अधिक आहे.
दुसरे गाणे नोव्हेंबरमध्ये रिलीज झाले
सिद्धू मुसेवालाचे दुसरे गाणे 'VAAR' 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त लाँच करण्यात आले. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत या गाण्याला 44 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
सिद्धू मूसेवालाने हे गाणे पंजाबचे शूर वीर आणि महान योद्धा हरिसिंह नलवा यांच्यावर गायले होते. सरदार हरिसिंह नलवा हे महाराजा रणजित सिंग यांचे लष्करप्रमुख होते. महान योद्धा हरिसिंह नलवा यांनी पठाणांविरुद्ध अनेक लढायांचे नेतृत्व केले आणि महाराजा रणजित सिंग यांना विजय मिळवून दिला होता.
सरकारने SYL या गाण्यावर घातली होती बंदी
SYL हे गाणे 23 जून रोजी सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर रिलीज झाले होते. या गाण्यात मूसेवालाने पंजाबच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या गाण्याला 72 तासांत 27 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर या गाण्यावर भारतात बंदी घालण्यात आली.
संगीत क्षेत्रावर 6 वर्षे अधिराज्य केले
वयाच्या 28 व्या वर्षी मूसेवालाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. संगीत क्षेत्रावर त्याने सहा वर्षे अधिराज्य गाजवले. 2022 मध्ये सिद्धू मूसेवालाची नेटवर्थ 5 मिलियन डॉलर इतकी होती. एवढेच नाही तर 2020-21 मध्ये त्याने सरकारला 3.02 कोटी रुपये इनकम टॅक्सच्या रुपात दिले होते.
मूसेवालाबद्दल अधिक जाणून घ्या...
नाव | शुभदीप सिंह सिद्धू (सिद्धू मूसेवाला) |
जन्मस्थळ आणि तारीख | गांव मूसा – 11 जून 1993 |
उंची | 185 CM |
वजन | 85 Kg |
फूड हॅबिट | नॉन व्हेजिटेरियन |
आवडते फूड | राजमा आणि बटर चिकन |
आवडता खेळ | फुटबॉल |
आवडते ठिकाण | कॅनडा आणिर न्यूयॉर्क |
छंज | म्युझिक इंस्ट्रूमेंट वाजवणे, प्रवास आणि शॉपिंग करणे |
आवडता अभिनेता | दलजीत दुसांझ |
आवडता पंजाबी गायक | कुलदीप मानक |
आदर्श | अमेरिकन रॅपर टूपॅक शकूर |
आवडते ब्रँड्स | Louis Vuitton, Armani |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.