आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहित आहे का?:सिमींच्या बोल्ड सीनमुळे उठले होते वादंग, कोर्टापर्यंत गेले होते प्रकरण; आयुष्यात मूल न मिळू शकल्याचा आहे पश्चात्ताप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 वर्षांच्या वयात मिळाली पहिली संधी

दिग्गज अभिनेत्री सिमी ग्रेवाल बॉलिवूडमध्ये ‘द लेडी इन व्हाइट’च्या नावाने प्रसिद्ध होत्या. वाढत्या वयातही सिमींचे साैंदर्य टिकून अाहे. अलीकडेच म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी त्यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेऊया...

सिमी ग्रेवाल यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1947 रोजी पंजाबच्या लुधियानामध्ये झाला. त्यांचे आजोबा कॅप्टन आणि योद्धे होते. त्यांचे वडील भारतीय लष्करात ब्रिगेडियर होते. सिमी यांचे पालनपोषण आणि शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. पाच वर्षांची असताना सिमीने राज कपूरचा “आवारा’ पाहिला होता. चित्रपट पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या की चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आई-वडील नाराज झाले, मात्र सिमी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यानंतर सिमी यांच्या आई-वडिलांनी त्यांना एका वर्षाचा वेळ दिला. अशा प्रकारे सिमी चित्रपटाकडे वळल्या आणि मेहनत आणि अभिनय कौशल्याने भारतीय सिनेमात एक वेगळे स्थान निर्माण केले.

  • 15 वर्षांच्या वयात मिळाली पहिली संधी

इंग्लंडमध्ये बालपण गेल्यामुळे सिमीचा बोलण्याचा टोन वेगळा होता. इंग्रजी भाषा असल्यामुळे दिग्दर्शकांनी तिला “टारझन गोज टू इंडिया’ चित्रपटात संधी दिली. त्या वेळी त्या फक्त 15 वर्षांच्या होत्या. फिरोज खानसोबत त्यांनी 1962 मध्ये पदार्पण केले. यात त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात सिमीने केलेले सर्व चित्रपट चांगले होते. त्यांना अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक ज्याप्रमाणे राज कपूर, सत्यजित रे, मृणाल सेन अाणि राज खोसलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर सिमी यांनी शशी कपूरसोबत ‘सिद्धार्था’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात न्यूड सीन देण्यामुळे त्या वादात अडकल्या होत्या. त्या वेळी दाेन इंग्रजी दैनिकांच्या कव्हर पेजवर चित्रपटातील ताे फोटो प्रकाशित झाला होता. त्या काळात या दृश्यावरून भारतात बराच गोंधळ झाला होता. त्या वेळी प्रकरण इतके वाढले की न्यायालयात गेले होते. शेवटी चित्रपट सेन्सॉर बोर्डामुळे भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही.

  • जेव्हा अनाथाश्रमात मूल दत्तक घेण्यासाठी गेल्या सिमी

सिमी ग्रेवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, त्यांना आयुष्यात मूल न मिळू शकल्याचा पश्चात्ताप आहे. एकदा त्या मुलगी दत्तक घेण्यासाठी अनाथाश्रमात गेल्या होत्या. तेथे विजया नावाची मुलगी त्या दत्तक घेणार होत्या. दत्तक घेण्याची वेळ आली तेव्हा आई-वडीलही आले. अशा प्रकारे सिमी यांना मुलाचे सुख मिळाले नाही. त्या वेळी देव आनंद यांनी त्यांना धीर दिला. त्यांच्या बोलण्याने सिमींना मोठा आधार मिळाला.

  • दिग्दर्शनातही आजमावला हात

अभिनयाव्यतिरिक्त काही तरी वेगळे करण्याची सिमी यांची इच्छा होती. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनातही काम केले. त्यांनी स्वत:ची प्राॅडक्शन कंपनी ‘सिगा आर्ट इंटरनॅशनल’ उघडली होती. यात त्यांनी दूरदर्शनसाठी एक मालिका ‘इट्स वुमन वर्ल्ड’चे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनही केले. सिमी यांनी यूकेच्या चॅनल 4 साठी 'लिव्हिंग लिजेंड राज कपूर’ या नावाने एक माहितीपटही बनवला होता. हा माहितीपट ‘इंडियाज राजीव’ तीन भागांत मिळवून बनवला होता. यासोबत सिमी यांनी एक हिंदी चित्रपट “रुखसत’साठी लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. िसमी यांनी टीव्हीवरही काम केले.

  • बोल्डनेसमुळे झाली टीकेची धनी

सिमी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत काम केले. 1970 मध्ये त्यांनी राज कपूर दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’ मध्ये काम केले होते. यात त्यांनी एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. तिच्यावर एक विद्यार्थी प्रेम करू लागतो. चित्रपटात तरुण विद्यार्थ्याची भूमिका ऋषी कपूरने साकारली होती. चित्रपटात एक अंघोळीचे दृश्य होते.

पुरस्कार

  • 1967मध्ये 'दो बदन’ साठी सिमी यांना उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
  • 1969 मध्ये 'साथी’ साठी सिमी यांना उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
  • 1981 मध्ये 'कर्ज’ साठी उत्कृष्ट सह अभिनेत्रीसाठी नामांकन.
  • 1999 मध्ये स्क्रीन अवॉर्डमध्ये उत्कृष्ट टॉक शो आणि उत्कृष्ट सूत्रसंचालनाचा पुरस्कार मिळाला.