आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेपोटिज्मवर वाद:सिमी ग्रेवाल यांनी कंगनाच्या धाडसाचे केले कौतुक, म्हणाल्या -  माझंही करिअर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला होता, पण हिंमत नसल्याने मी बोलू शकले नाही 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिमी ग्रेवाल यांनी शनिवारी रात्री एकनंतर अनके ट्विट केले - यामधील एकामध्ये लिहिले की, एका शक्तिशाली व्यक्तीने त्यांचे करिअर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला होता
  • सिमी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये अशी क्रांती येऊ शकते, जशी अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर आली होती

ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि फेव्हरेटिज्म विरोधात सतत आवाज उठवत असणाऱ्या कंगना रानोटचे कौतुक केले आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करुन सांगितले की, सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर तिला निराश वाटत होते. त्या असेही म्हणाल्या की एका पावरफुल व्यक्तीने त्यांचे करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला होता.

मी कंगनासारखी धाडसी नव्हते : सिमी

सिमी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "मी बोल्ड आणि धाडसी असलेल्या कंगना रानोटचे कौतुक करते. एका शक्तिशाली माणसाने माझे करियर उधळण्याचा प्रयत्न केला होता. मी शांत राहिलो. कारण मी कंगनासारखी धाडसी नव्हते.

'सुशांतने जे केले त्याबद्दल मी अस्वस्थ आहे'

खरं तर, चॅनलवर टेलीकास्ट झालेल्या सुशांतच्या मृत्यू आणि नेपोटिज्मविषयी  कंगनाने शनिवारी अर्णब गोस्वामींना मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा संदर्भ देताना सिमीने लिहिले की, "कंगनाची अर्णबने घेतलेली मुलाखत पाहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवी झाली. परंतु या मुलाखतीने मला खूप डिप्रेस्ड केले. सुशांत सिंह राजपूतने जे केले आणि बॉलिवडूमध्ये आउटसाइडर्ससोबत जे होते त्यासाठी मी व्याकूळ आहे. हे अवश्य बदलायला हवे.'

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर झालेल्या क्रांतीचा दिला हवाला 

सिमी यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये 46 वर्षीय अश्वेत जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेतील क्रांतीचा संदर्भ दिला आणि लिहिले की, "अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर घडलेल्या प्रकारची क्रांती. बॉलिवूडमध्ये तीच जागृत सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर येऊ शकतात. "