आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरमध्ये काश्मीर फाइल्सवर बंदी, ट्विटरवर युद्ध सुरू:थरूर म्हणाले –सरकारी जाहिरात करणारे चित्रपट चालणार नाही

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. विवक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, आता हा चित्रपट सिंगापूरात प्रदर्शित केले जाणार आहे. मात्र, तेथील सेंसर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस खासदार शशि थरुर यांनी विवेक अग्निहोत्री आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले की, 'भारतातील सत्ताधारी पक्षाकडून ज्या चित्रपटाचा प्रचार केला जात होता, त्या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.'
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले की, 'भारतातील सत्ताधारी पक्षाकडून ज्या चित्रपटाचा प्रचार केला जात होता, त्या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.'

सिंगापूरमध्ये द काश्मीर फाईल्सवर का आणण्यात आली बंदी?

काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी आपल्या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. त्यात त्यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर का बंदी लादण्यात आली याविषयी माहिती दिली आहे. स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी लिहले आहे की, "द काश्मीर फाईल्समध्ये मुस्लिम समाजाविषयी चुकीचे माहिती पोहोचवली जात असून, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हिंदूंवर अत्याचार केल्याची एकतर्फी भूमिका यात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपटांवर प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जात नाही." असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे.

शशी थरूर यांनी शेअर केलेला स्क्रीनशॉट.
शशी थरूर यांनी शेअर केलेला स्क्रीनशॉट.

विवेक अग्निहोत्रींनी दिले उत्तर

विवेक अग्निहोत्री यांनी खासदार शशी थरुर यांना बावळट असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रिय शशी थरुर, तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की, सिंगापूर हे जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सर आहे. त्यांनी द लास्ट टेम्पटेशंस ऑफ जीसस क्राइस्ट' वर देखील बंदी घातली आहे. (तुमच्या मॅडमला विचारा) या व्यतिरिक्त 'द लीला हॉटेल फाइल्स' या रोमँटिक चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. कृपया काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाची चेष्टा करणे थांबवा.

बातम्या आणखी आहेत...