आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदनाने ट्रोलरला सुनावले:लता मंगेशकरांवर टीका करणा-या नेटक-यावर भडकले अदनान सामी, म्हणाले - 'गाढवाला गुळाची चव काय!'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका नेटक-याने फोटोवर कमेंट करताना लता मंगेशकर यांच्यावर टीका केली.

गायक अदनान सामी यांनी गुरुवारी दिग्गज गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहां यांचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी 'किती आयकॉनिक आणि ऐतिहासिक फोटो आहे', असे कॅप्शन दिले. यानंतर एका नेटक-याने फोटोवर कमेंट करताना लता मंगेशकर यांच्यावर टीका केली. यामुळे अदनान सामी यांनी या नेटक-याला चांगलेच सुनावले.

नेटक-याला अदनानचे चोख उत्तर
अदनान सामी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर यूजरने लिहिले की, 'लता मंगेशकरांचा आवाज चांगला आहे असा विचार करण्यासाठी भारतीयांचे ब्रेन वॉश करण्यात आले आहे.' यावर अदनान यांनी उत्तर देताना लिहिले की, 'गाढवाला गुळाची चव काय. आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करुन मुर्ख दिसण्यापेक्षा गप्प राहणे केव्हाही चांगले.'

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिला पाठिंबा
अदनान व्यतिरिक्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही लता मंगेशकर यांचे समर्थन केले आहे. त्यांनी यासंबंधी अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. विवेक यांनी लिहिले की, 'मी देवाला प्रार्थना करतो की लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे पुढच्या जन्मी आमच्यासारखे मनुष्य होवोत ज्यांना सुंदरता नक्की काय असते आणि देवत्व नक्की कसे असेल ते त्यांना कळेल.'

आपल्या आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'माझा सरस्वती आणि दिव्यतेवर विश्वास आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे लता मंगेशकर. माझा सैतानावरही विश्वास आहे, याचे कारण म्हणजे लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे लोक,' असे त्यांनी म्हटले आहे.

चाहत्यांनीही केले समर्थन
अदनान आणि विवेक यांच्या व्यतिरिक्त लता दीदींच्या चाहत्यांनीही त्यांचे समर्थन करत ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. एका नेटक-याने ट्रोलर्सला प्रत्युत्तर देताना म्हटले की, 'लता मंगेशकर या भारतासाठी दैवी देणगी आहेत.'

आणखी एका यूजरने लिहिले- 'काही लोक राजकारणात इतके आंधळे आहेत की ते भारताच्या स्वर कोकिळेला अपमानास्पद वागणूक देताना मागेपुढे पाहात नाहीत. अशा मूर्खांचा निषेध असो. लोक इतके विष घेऊन कसे जगतात?' अदनान यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिल्यापासून सोशल मीडियावर 'लता जी' ट्रेंड होत आहे.

बातम्या आणखी आहेत...