आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजाचे अनेक चाहते आहेत. आवाजाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी यूट्यूबवरही राज्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच अलका याज्ञिक 15.03 बिलियन स्ट्रीम्ससह यूट्यूबवर सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गायिका ठरल्या. या यादीत त्या पहिल्या क्रमांकावर होत्या. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी BTS, ब्लॅकपिंक आणि टेलर स्विफ्टलाही मागे टाकले. गेल्या 12 महिन्यांत अलका याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा ऐकण्यात आले, ज्यामुळे त्या 2022 मध्ये जगातील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या कलाकार बनल्या होत्या.
सायशाने मला ग्लोबल आयकॉन 'के पॉप' बद्दल सांगितले
नुकतीच अलका याज्ञिक यांनी रेडिओ नशाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, या यशाबद्दल त्या फारशा खूश नव्हत्या, कारण त्यांना त्यांच्या या रेकॉर्डबद्दलची कल्पनाच नव्हती. अलका याज्ञिक म्हणाल्या, "मला BTS बद्दलदेखील माहिती नव्हती. माझी मुलगी सायशा हिने मला ग्लोबल आयकॉन पॉपबद्दल आणि या आकड्यांविषयी सांगितले."
मी विचारले तेव्हा माझ्या मुलीला आश्चर्य वाटले
त्या पुढे म्हणाल्या, "मी माझी मुलगी सायशाला विचारले, "हा BTS कोण आहे?, हे ऐकून माझी मुलगी आश्चर्यचकित झाली आणि हसायला लागली. ती मला म्हणाला- 'आई, तू पण कमाल आहे."
अलका यांनी सांगितल्यानुसार, BTS बद्दलची माहिती त्यांना त्यांच्या मुलीकडून मिळाली. अलका म्हणाल्या- "जेव्हा तिने मला या यशाबद्दल सांगितले तेव्हा मी फार इम्प्रेस झाले नाही. माझ्या मुलीला आश्चर्य वाटले की, एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटनंतरही मी एक्साइडेट का नाही."
जोपर्यंत लोकांना माझे काम आवडेल तोपर्यंत मला आकड्यांची पर्वा नाही
संगीत कारकिर्दीबद्दल बोलताना अलका म्हणाल्या होत्या, "जोपर्यंत लोकांना माझे काम आवडत राहणार तोपर्यंत मला आकड्यांची पर्वा नाही. कमी-जास्त संख्येने मला काही फरक पडत नाही. जे लोक मला ऐकतात, ते माझ्यावर प्रेम करत आहेत. त्यांनी मला पसंत केले आहे आणि इतक्या वर्षांपासून त्यांनी माझे खुल्या मनाने स्वागत केले आहे. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हे यश मिळाल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे," असे त्या म्हणाल्या.
2022 मध्ये YouTube वर सर्वाधिक स्ट्रीम करण्यात आलेले सेलिब्रिटी
कलाकारांची नावे | स्ट्रीमिंग नंबर्स |
अलका याज्ञिक | 15.03 बिलियन |
प्यूर्टो रिको | 14.07 बिलियन |
BTS | 7.95 बिलियन |
ब्लॅकपिंक | 7.03 |
द वीकेंड | 5.07 बिलियन |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.