आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास बातचीत:माझे आणि पल्लवीचे नाते तुटण्याच्या मार्गावर आले होते - गायक अंकित तिवारीचा खुलासा

उमेश कुमार उपाध्याय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकितचा या शोमध्ये येण्याचा मुख्य हेतू पत्नीसोबत वेळ घालवणे हा आहे.

गायक अंकित तिवारी आणि त्याची पत्नी पल्लवी तिवारी हे स्टार प्लसवरील 'स्मार्ट जोडी' या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहेत. अंकितचा या शोमध्ये येण्याचा मुख्य हेतू पत्नीसोबत वेळ घालवणे हा आहे. कारण एक वेळ अशी होती की, पत्नीला वेळ न दिल्याने अंकितचे वैवाहिक नाते तुटण्याच्या मार्गावर होते. दोघेही वेगळे राहू लागले होते. दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये अंकितने त्यांच्या नात्यात कोणत्या कारणामुळे दुरावा निर्माण झाला होता आणि तो दुरावा कसा दूर केला, यासह अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

  • पत्नी पल्लवीला वेळ न दिल्याने तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर आले होते, असे ऐकिवात आहे?

होय, एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता हे खरे आहे. आमचे नाते खरंच तुटण्याच्या मार्गावर होते. पण, फक्त वेळेने मला वाचवले. गोष्टी चांगल्या झाल्या. खासकरून मी माझ्या जोडीदाराला वेळ देऊ शकतो या बाबतीत स्मार्ट जोडी हा शो खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मी विचार केला, त्यापेक्षा जास्त वेळ देत आहे. ज्या दिवशी आम्ही शूट करतो त्या दिवशी आम्ही खूप वेळ एकत्र घालवतो, कारण कमीतकमी 12 तास शूट चालतं. नाते अधिक दृढ करण्यासाठी हा काळ अधिक चांगला आहे.

  • कोणत्या टप्प्यावर तुमच्यात मदभेद निर्माण झाले? सविस्तर सांग?

गोष्ट अशी होती की, मी पत्नीला वेळच देऊ शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही एकत्र वेळ घालवू शकत नव्हतो. आमचा हनिमूनही झाला नव्हता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच माझा चंदीगडमध्ये एक शो होता, त्यानंतर चंदीगडला शो करायला गेलो. वाटलं हा शो करेन, मग तिकीट बुक करेन. पण पुन्हा मधेच काही काम यायचे. आधी काम पूर्ण करुया आणि नंतर हनीमूनला जाऊया, या विचारात मी होतो. पण सतत काम निघत राहिले आणि मी फक्त बाहेर जाण्याचा विचारच करत राहिलो. हा एखाद्या पत्नीवर होणारा अन्यायच आहे. कारण ती अनेक स्वप्ने घेऊन सासरच्या घरी येते. फारशा नाहीत पण नव-यासोबत हनिमूनला जावं असं स्वप्न कोणत्याही तरुणीचं असतं. पण पल्लवीला हे सगळं काही मिळाले नाही. नियोजन अपूर्ण राहिले. ती माझी चुक होती. अशा प्रकारे त्याची चूक त्याने मान्य केली. माहेरी आणि सासरी वावरताना मुलींना ब-याच तडजोडी कराव्या लागतात. पण सासरी आल्यानंतर तिला सगळ्या गोष्टीत सामावून घेण्याची जबाबदारी ही नव-याची असते. पण मला ही गोष्ट जमली नाही. एकूणच हा सर्व टायमिंगचा खेळ होता.

  • काळाने तुमचे नाते कसे वाचवले? दोघांनी आपली चूक कशी मान्य केली?

आम्ही दोघांनी पुढाकार घेतला. चूक कोणाची असो, आम्ही दोघांनी ती मान्य केली. असं म्हणतात की, कोणत्याही गोष्टीचा विचार करा, मग नवीन सुरुवात होते. आम्ही विचार केला आणि नात्याची एक नवीन सुरुवात झाली. या नव्या सुरवातीला आम्ही कोणालाही न विचारता पुढे निघालो. आज आम्ही पती-पत्नी आणि कुटुंब म्हणून खूप आनंदी आहोत. आम्हाला एक लहान मुलगी आर्या आहे, आम्ही तिघेही चांगले आयुष्य जगत आहोत. सर्व काही चांगले आहे.

  • पल्लवीची चूक काय होती आणि तिने ती कशी मान्य केली?

प्रत्येकाचा स्वतःचा स्वभाव असतो. पल्लवीच्या दृष्टिकोनातून बोलायचं तर तिची चूक अशी होती की ती मला सोडून गेली होती. नंतर मी घर सोडायला नको होते हे तिने मान्य केले. तुला वेळ का देता येत नाही हे मला समजायला हवे होते. कदाचित मी घाई केली. मी अजून थोडा वेळ थांबू शकले असते, असे पल्लवी मला म्हणाली होती. खरं तर जर आम्ही दोघे एकमेकांना वेळ देऊ शकलो असतो, तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या. जेव्हा आपण बोलतो तेव्हाच मार्ग निघतो. बरं, आम्ही दोघांनी आमच्या चुका मान्य केल्या आणि गोष्टी चांगल्या झाल्या.

  • दोघांमधील नातं जोडण्यात आणि ते घट्ट करण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची होती?

माझी मुलगी आर्याने महत्त्वाची भूमिका बजावली, हे तिला माहीतही नसेल. पल्लवी जेव्हा घर सोडून बंगळुरूला गेली तेव्हा तिथे मुलीची तब्येत बिघडली होती. आमची मुलगी तेव्हा एक वर्षाचीही झाली नव्हती. त्यावेळी आम्ही दोघेही फोनवर बोलत नव्हतो, कारण आम्ही एकमेकांवर रागावलो होतो. मुलगी आर्याची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. अचानक मला पल्लवीचा फोन आला, मग तिने सांगितले. मी तातडीने बंगळुरुला गेलो. मुलीला थोडे बरे वाटल्यानंतर मी पल्लवी आणि आर्याला मुंबईत घेऊन आला. जेव्हा आम्ही विमानतळावर भेटलो तेव्हा वाटले हे माझे कुटुंब आहे. ही माझी मुलगी आहे आणि ही माझी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी मोठ्या खुबीने मला पार पाडायची आहे. तिथे मी हा निर्णय घेतला.

  • सकारात्मक असो वा नकारात्मक, माणूस कायम शिकत राहतो, तू यातून काय शिकला?

रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो हे मी शिकलो. जेव्हा तुम्ही रागावता आणि चिडता तेव्हा तुमच्या मनात सैतान बसलेला असतो. त्यावेळी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो चुकीचा असेल. रागाच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये हे मी शिकलो. एक-दोन दिवस, तुम्हाला जो काही वेळ लागेल, तो वेळ जाऊ द्या. त्यानंतरच तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. दोन-तीन दिवसानंतर निर्णय झाल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल. रागाने घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो.

  • बरं, पत्नी पल्लवीसोबत पहिला शो करताना किती एक्साइटेड आहेस?

पल्लवी खूप उत्साहित आहे. शूटिंगला जाणे, पल्लवी तिवारी असे नाव लिहिलेली सुंदर व्हॅनिटी असणे, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, कॉश्च्युम डिझायनर सेटवर कॅमेर्‍याला सामोरे जाणे, सर्वकाही तिच्यासाठी प्रथमच आहे. तिला हे सगळं अनुभवताना बघून मला खूप आनंद वाटतो.

बातम्या आणखी आहेत...