आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध अमेरिकन गायक बॉबी ब्राउन (51) यांचा मुलगा बॉबी ब्राउन ज्युनिअरचे निधन झाले आहे. 28 वर्षीय ब्राउन ज्युनिअर बुधवारी लॉस एंजेलिस येथील आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. लॉस एंजलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी 1: 50 वाजता ही घटना घडली. पोलिसांच्या मते, या घटनेत कोणत्याही प्रकारचे फाऊल प्ले नाही. ब्राउन ज्युनिअर हा बॉबी ब्राउन आणि किम वार्ड यांचा मुलगा होता.
8 वर्षात ब्राउन कुटुंबातील अशा प्रकारची ही तिसरी घटना
बॉबी ब्राऊनच्या कुटुंबात गेल्या आठ वर्षांत घडलेली ही तिसरी घटना आहे. 2012 मध्ये, बॉबी ब्राउनची पत्नी आणि प्रसिद्ध गायिका व्हिटनी ह्यूस्टन बेवर्ली हिल्स हॉटेलच्या रुमच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
2015 मध्ये बॉबी ब्राउनची 22 वर्षीय मुलगी बॉबी क्रिस्टीना ब्राउन अटलांटाच्या घरी बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा चेहरा बाथटबमध्ये बुडाला होता. मृत्यूपूर्वी ती 6 महिने कोमात होती. शवविच्छेदन अहवालात बॉबी क्रिस्टीनाच्या शरीरात मॉर्फिन, कोकेन, अल्कोहोल आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आढळले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.