आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायिका चिन्मयी श्रीपादा हिने अलीकडेच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गायिकेने बुधवारी सोशल मीडियावर तिच्या मुलांचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या मुलांची नावेही उघड केली आहेत. तसेच, दुसऱ्या एका पोस्टमध्ये चिन्मयीने स्पष्ट केले की, ती सरोगसीद्वारे आई बनलेली नाही. चिन्मयीने एका मुलीला आणि मुलाला जन्म दिला आहे.
चिन्मयीने पोस्ट केला जुळ्या मुलांचा फोटो
चिन्मयीने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या हातात मुलांचा हात दिसत आहे. जुळ्या मुलांचे नाव सांगताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "द्रिपता आणि शरवस. आमसाठी आमचे विश्व आहे." तसेच, तिने तिच्या फॉलोअर्सला सांगितले की ती काही काळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नव्हती. त्यामुळे ती डायरेक्ट मेसेजला रिप्लाय देऊ शकली नाही. चिन्मयीचा पती राहुल रवींद्रन यानेही हीच पोस्ट आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे.
गरोदरपणाचे फोटो शेअर न करण्याचे सांगितले कारण
चिन्मयीने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी त्या लोकांच्या प्रेमात पडले आहे, ज्यांनी मला माझी मुले सरोगसीद्वारे जन्माला आलीत का असा प्रश्न केला होता. कारण मी सोशल मीडियावर प्रेग्नेंसीचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. मी स्वत:ला प्रोटेक्ट करत होते, त्यामुळे फक्त जवळच्या लोकांनाच माझ्या गर्भधारणेबद्दल माहीत होतं."
सी-सेक्शनदरम्यान चिन्मयीने गायले भजन
गायिकेने पोस्टमध्ये पुढे लिहिले, "मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, कुटुंबाबद्दल आणि मित्र मंडळाबद्दल नेहमीच रिझर्व असते आणि राहीन. मी सोशल मीडियावर आमच्या मुलांचे फोटो देखील पोस्ट करणार नाही. जेव्हा माझी मुले या जगात येणार होती तेव्हा मी माझ्या सी-सेक्शन दरम्यान एक भजन देखील गायले आहे."
2014 मध्ये झाले होते चिन्मयी-राहुलचे लग्न
चिन्मयी आणि राहुलचे मे 2014 मध्ये चेन्नईमध्ये लग्न झाले होते. चिन्मयीने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत. तिने 'गुरु' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही आपला आवाज दिला आहे. शिवाय मराठीतील गाजलेल्या सैराट या चित्रपटासाठीही तिने गाणी स्वरबद्ध केली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.