आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायिकेच्या घरी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन:हर्षदीप कौर पहिल्यांदा झाली आई, मुलाला दिला जन्म; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमच्या ज्युनिअर सिंगचे आगमन झाले असून आम्ही खूप आनंदी आहोत

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर आणि मनकीत सिंग पहिल्यांदा आईबाबा झाले आहेत. हर्षदीपने मंगळवारी मुलाला जन्म दिला. तिने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या पोस्टसह हर्षदीपने पती मनकीत सिंगसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. "इट्स अ बॉय, 02-03-2021, अँड अ‍ॅडव्हेंचर बिगेन्स." असे या फोटोवर लिहिले आहे.

आमच्या ज्युनिअर सिंगचे आगमन झाले असून आम्ही खूप आनंदी आहोत
हर्षदीप कौरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "नुकतेच एक छोटेसे नंदनवन पृथ्वीवर आले असून त्याने आम्हाला आईबाबा बनवले आहे. आमचे ज्युनिअर सिंग आले आहे. आणि आम्ही खूप आनंदी आहोत,' असेही हर्षदीप म्हणाली आहे.

फेब्रुवारीत चाहत्यांना दिली होती गोड बातमी
हर्षदीपने फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. त्यानंतर तिने बेबी बंपला फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. ज्युनियर सिंग लवकरच मार्च 2021 मध्ये येत असल्याचे तिने सांगितले होते.

2015 मध्ये झाले लग्न

हर्षदीप बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिने 'कटिया करुं', 'दिलबरो', 'नच दे सारे', 'जालीमा' अशी अनेक हिट गाणी गायली आहेत. परीक्षक म्हणून ती अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे. हर्षदीपने 2015 मध्ये मनकीत सिंगसोबत लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...