आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बातचीत:गायक जावेद अली म्हणाले - 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याच्या हिंदी व्हर्जनसाठी 5 गायकांच्या नावावर झाली होती चर्चा

अमित कर्ण11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावेद अली यांनी या गाण्याच्या मेकिंगबद्दलच्या खास गोष्टी दिव्य मराठीसोबत शेअर केल्या आहेत.

बॉलिवूड आणि हिंदी भाषिक राज्यांमध्ये सध्या कोणत्याही बॉलिवूड स्टारऐवजी तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या नावाची चर्चा सुरु आहे. 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटावर होणारी चर्चा आणि यशावर केस स्टडीज सुरु आहेत. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. 'सामी सामी' सोबतच 'श्रीवल्ली' हे गाणेही खूप प्रसिद्ध झाले आहे. 'श्रीवल्ली'चे हिंदी व्हर्जन जावेद अलीने गायली आहे. जावेद अली यांनी या गाण्याच्या मेकिंगबद्दलच्या खास गोष्टी दिव्य मराठीसोबत शेअर केल्या आहेत.

गेलो होतो इलैया राजांच्या गाण्यासाठी
जावेद यांनी सांगितले, या गाण्याचे संगीत देवी श्रीप्रसाद यांनी दिले आहे. आम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतो. मात्र, गेल्या वर्षी मी इलैया राजा जी यांच्या गाण्याच्या कामासाठी चेन्नईला गेलो होतो. इलैया राजा यांनी मला पहिल्यांदा गाण्यासाठी बोलावले होते. त्याचवेळी मला डीएसपी म्हणजेच देवी श्री प्रसादजींचा फोन आला. त्यांनी सांगितले की, आपल्याला 'श्रीवल्ली' हे गाणे करायचे आहे. आपण ते कसे करू शकतो. मी त्यांना सांगितले की मी चेन्नईला येत आहे. डीएसपी देखील इलैया राजांचे मोठे चाहते आहेत.

चेन्नईमध्ये अडीच तासात रेकॉर्ड करण्यात आले गाणे
जावेद पुढे सांगतात, मी चेन्नईला पोहोचलो, ताज हॉटेलमध्ये थांबलो आणि एक दिवस विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी इलैया जींचा फोन कधी येईल याची वाट पाहत होतो. मात्र, त्या दिवशी इलैया राजाजींचा फोन आला नाही. इतक्यात डीएसपींनी मला पुन्हा फोन करून बोलावले. त्यांनी 'श्रीवल्ली' हे गाणे रेकॉर्ड आणि डब करायला सांगितले. रेकॉर्डिंगच्या मध्येच इलैया जींचा फोन आला तर तुम्ही तिथे जा, असे डीएसपींनी मला सांगितले होते. म्हणून मी डीएसपींकडे गेलो. सुमारे दोन ते अडीच तासांत संपूर्ण गाणे रेकॉर्ड झाले. आता ते एवढे इतका लोकप्रिय झाले आहे की सोशल मीडियावर त्याचे पाच लाख रील्स झाले आहेत.

गाण्यात कविता, अर्थ, सगळं काही
जावेद अली यांना गाण्याची शब्दरचना आवडली. ते म्हणाले, हे गाणे अप्रतिम होते. मागच्या वर्षीही मी त्यांच्यासाठी आणखी एक तेलुगु गाणे केले होते. मात्र ते हिंदीत आले नाही. त्यांनी 'श्रीवल्ली' हिंदीत आणायचे ठरवले. या गाण्यात उर्दू शब्दही आहेत. जसे 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली', 'नैना मटक बरफी', 'पोशिदा'. मी ते थोडे स्टाइलाइज करुन गायले. सामान्य टोन नाही ठेवला. गाणे छान रेकॉर्ड केले आहे.

इकडे दिवसभर इलैया राजाजींचा फोन आला नाही. ते छानच झाले. त्यांचा नंतर रात्री मला फोन आला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा पूर्णपणे निवांत झालो. त्यानंतर इलैया जींसाठी एक गाणे केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 'श्रीवल्ली' हे गाणे गायले. यावेळी मी वेगळ्या टेक्स्चरमध्ये ते गायले. खरं तर या गाण्यासाठी पाच गायकांच्या नावाची चर्चा सुरू होती. शेवटी, डीएसपी म्हणाले की फक्त जावेदच हे गाणे गाणार आहे.

श्रीदेवी शब्दासह रेकॉर्ड झाले होते गाणे
जावेद यांनी सांगितले, मी अजून चित्रपट पाहिला नाही. श्रीवल्ली हे बहुधा पात्राचे नाव आहे. डीएसपींनी डबिंग दरम्यान सांगितले, हिंदीमध्ये 'श्रीवल्ली' दक्षिण भारतीय वाटेल, त्यामुळे श्रीवल्लीऐवजी 'श्रीदेवी' हा शब्द ठेवण्यात आला. मात्र, नंतर 'श्रीवल्ली' हिंदीतही कायम ठेवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...