आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल नुकताच इमारतीच्या पायऱ्यांवरून पडला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले. आता मात्र त्याने स्वत: त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत. यासोबतच जुबिनने त्याच्या चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभारेदेखील मानले आहेत.
देवाने मला वाचवले
जुबिनने हॉस्पिटलच्या खोलीतील त्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. देवाने माझ्यावर कृपा केली आणि मला या गंभीर अपघातातून वाचवले. मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि आता मी बरा होत आहे. तुमचे कधीही न संपणारे प्रेम आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद," असे जुबिन म्हणाला आहे.
सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया
जुबिनची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. रॅपर बादशाहने लिहिले की, 'भावा लवकर बरा हो.' तर गायिका तुलसी कुमारने लिहिले, 'खूप प्रेम जुबिन. स्वतःची काळजी घे आणि लवकर बरा हो.'
जुबिनच्या उजव्या हातावर झाली शस्त्रक्रिया
पडल्यामुळे जुबिनच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली. याशिवाय त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. पडल्यानंतर लगेचच त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जुबिनच्या हातावर एवढी गंभीर दुखापत होती की, डॉक्टरांना त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनीही सध्या जुबिनला उजव्या हाताची हालचाल न करण्याचा सल्ला दिला आहे.
जुबिनने म्युझिक इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
जुबिन नौटियाल हे इंडियन म्युझिक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. राता लांबिया, लूट गए, हमनवा, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम जिंदगी, कुछ तो बता जिंदगी आणि देखते देखते यांसारखी अनेक गाणी त्याने गायली आहेत. त्याची बहुतेक गाणी हिट झाली आहेत. गाणी आणि लूक्समुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.