आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक जुबिन नौटियालचा अपघात:घरीच पायऱ्यांवरुन पडला, कोपर, बरगड्या आणि डोक्याला गंभीर दुखापत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात झाला आहे. गुरुवारी घरीच पाय-यांवरुन तो पडला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या कोपर, बरगड्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. त्याच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुबिन नौटियाचे 'तू सामने' हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. गायिका योहानीसह त्याने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. गुरुवारी जुबिन नौटियाल आणि योहानी या गाण्याच्या लाँचवेळी एकत्र दिसले होते. त्यानंतर ही घटना घडली. या अपघातात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. जुबिनच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आहे जुबिन
जुबिनचा जन्म 14 जून 1989 रोजी डेहराडून येथे झाला. 2011 मध्ये तो 'एक्स फॅक्टर' या सिगिंग रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. त्यानंतर त्याला 2014 मध्ये सोनाली केबल या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी मिळाली. 'इक मुलाकत' या डेब्यू साँगनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. 'कबीर सिंग' या चित्रपटातील 'तुझे कितना चाहे और हम' हे गाणेही खूप गाजले. हिंदीसह जुबिनने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी गायली आहेत. सध्या अभिनेत्री निकिता दत्तासोबतच्या रिलेशनशिपमुळे जुबिन चर्चेत आहे.

बातम्या आणखी आहेत...