आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा केके:पंचत्वात विलीन झाले गायक केके, मुलीने लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली - 'लव्ह यू फॉरेव्हर डॅडी'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केके यांचे पार्थिव कोलकात्याहून बुधवारी रात्री मुंबईत आणले गेले, आज वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

बॉलिवूड गायक केके पंचत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. केके यांची मुलगी तमाराने वडिलांच्या फ्यूनरल कार्डसोबत एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले 'लव्ह यू फॉरेव्हर डॅडी'. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी कुटुंबीयांनी सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ ठेवली होती.

केके यांच्या मुलीची पोस्ट
केके यांच्या मुलीची पोस्ट

त्यानंतर अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. केके यांच्या अंत्य दर्शनासाठी इंडस्ट्रीतील त्यांचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले होते.

सुदेश भोसले, अभिजीती भट्टाचार्य, अलका याज्ञिक यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.

गायक सुरेश भोसले यांनी केके यांना अखेरचा निरोप दिला.
गायक सुरेश भोसले यांनी केके यांना अखेरचा निरोप दिला.
गायक आणि संगीतकार सलीम मर्चंट केके यांच्या घरी पोहोचले.
गायक आणि संगीतकार सलीम मर्चंट केके यांच्या घरी पोहोचले.
गायिका शिल्पा राव हिनेदेखील केके यांना श्रद्धांजली वाहिली.
गायिका शिल्पा राव हिनेदेखील केके यांना श्रद्धांजली वाहिली.
गीतकार आणि गायक अमिताभ भट्टाचार्य यांनी केके यांना अखेरचा निरोप दिला.
गीतकार आणि गायक अमिताभ भट्टाचार्य यांनी केके यांना अखेरचा निरोप दिला.
जावेद अलीही अंत्य दर्शनासाठी केके यांच्या घरी पोहोचले.
जावेद अलीही अंत्य दर्शनासाठी केके यांच्या घरी पोहोचले.
अखेरच्या दर्शनासाठी पंचायत फेम फैसल मलिकही केके यांच्या घरी पोहोचले.
अखेरच्या दर्शनासाठी पंचायत फेम फैसल मलिकही केके यांच्या घरी पोहोचले.
मुंबईला पोहोचल्यावर केके यांचे पार्थिव या वाहनातून त्यांच्या घरी नेण्यात आले.
मुंबईला पोहोचल्यावर केके यांचे पार्थिव या वाहनातून त्यांच्या घरी नेण्यात आले.
केके यांच्या अंत्य दर्शनासाठी त्यांचे जवळचे मित्र हरिहरन पोहोचले.
केके यांच्या अंत्य दर्शनासाठी त्यांचे जवळचे मित्र हरिहरन पोहोचले.

के.के. (कृष्णकुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले होते. कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ CMRI (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नोंदवले आहे. कोलकातास्थित न्यू मार्केट पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केके यांच्या चेहरा आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत.

शवविच्छेदनाचा अहवाल आला

केके यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसाची अवस्था गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात केके यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या पोस्टमॉर्टेमचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल सरकारने दिला राजकीय सन्मान
यापूर्वी कोलकाता येथे त्यांना राज्य सन्मानाने श्रद्धांजली वाहण्यात आली होती. वविच्छेदनानंतर केके यांचे पार्थिव रबींद्र सदन येथे आणले गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ज्योती कृष्णा, मुलगा नकुल आणि मुलगी तमारा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील रवींद्र सदनात पोहोचून केके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रवींद्र सदन येथे केके यांना अखेरचा निरोप दिला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रवींद्र सदन येथे केके यांना अखेरचा निरोप दिला.

हॉटेल स्टाफ आणि आयोजकांची होणार चौकशी
पोलिस आयोजक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हिंदी-तामिळसह 11 भाषांमध्ये गायली गाणी
23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 3500 जिंगल्स गायल्या.

'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
केके यांनी बॉलिवूडमध्ये 'माचीस' या चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय केके यांनी 'यारो', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवरापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत.

2000 मध्ये केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'पल' या म्युझिक अल्बममधून गायनाची केली होती सुरुवात
2021 मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक
केके यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, केके यांच्या निधनाने मी दुःखी आहे, सर्व वयोगटातील लोक त्यांच्या गाण्यांशी जोडलेले आहेत. आपल्या गाण्यांमधून ते कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

केके यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

या वृत्ताशी संबंधित बातम्या येथे वाचा : -

बातम्या आणखी आहेत...