आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. कोलकाता पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइव्ह कॉन्सर्टपूर्वी केके यांचे त्यांच्या पत्नी ज्योती कृष्णा यांच्याशी बोलणे झाले होते. केके यांनी त्यांच्या पत्नीकडे खांदे दुखत असल्याची तक्रार केली होती. तर 31 मे रोजी सकाळी ते त्यांच्या मॅनेजरला म्हणाले होते की, आज मला खूप अस्वस्थ वाटत असून शरीरात मुळीच शक्ती वाटत नाहीये.
सोफ्यावर डोके आदळले होते
पोलीस सूत्रांनी पुढे सांगितले की, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या होत्या. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सोफ्यावर बसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ही दुखापत झाली होती. ते खाली कोसळले होते. त्यावेळी सोफ्याचा कोपरा त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांच्या शरीरावर ओरखडे उमटले. केके रुममध्ये पडल्याचे पाहून त्यांच्या मॅनेजरने त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांना उचलू शकला नाही, म्हणून त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावले, त्यांच्या मदतीने केके यांना सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले.
केके नियमित अँटासिड औषध घेत असत
केके यांच्या हॉटेलच्या खोलीतूनही अनेक औषधे सापडली आहेत. त्यात अँटासिड्स, व्हिटॅमिन सी यासह होमिओपॅथिक गोळ्या आहेत. केके नियमितपणे डायझिन आणि अँटासिड औषधे घेत असे. शवविच्छेदन अहवालात केके यांच्या हृदयाभोवती जाड थर आढळला, जो पांढरा झाला होता. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजदेखील आढळले होते.
पोस्टमॉर्टममध्ये 3 मोठ्या गोष्टी उघड
1. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, केके यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूला 80% ब्लॉकेज होते आणि इतर ठिकाणी लहान ब्लॉकेज होते.
2. लाईव्ह शोमध्ये केके फिरत-फिरत गर्दीसोबत नाचत होते. यामुळे ते अधिकच उत्साहित झाले, त्यामुळे त्यांच्या हृदयातील रक्तप्रवाह थांबला. हृदयविकाराच्या झटक्याचे हे कारण होते. कार्डिअॅक अरेस्टमध्ये व्यक्तीच्या हृदयाची धडधड लगेच थांबते.
3. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रक्तप्रवाह थांबल्यामुळे गायकाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले. काही वेळातच केके बेशुद्ध पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याचवेळी त्यांना सीपीआर दिला असता तर आज ते जिवंत राहिले असते.
केके पंचत्वात विलीन झाले
गुरुवारी 53 वर्षीय केके पंचत्त्वात विलीन झाले. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. केके यांनी मुलगी तमाराने वडिलांच्या फ्युनरल कार्डसोबत नोट शेअर केली. तिने लिहिले 'लव्ह यू फॉरेव्हर डॅड'. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांनी साडेदहा ते साडेबारा ही वेळ ठेवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.