आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Singer KK Passed Away: At The Age Of 2, He Gave His First Stage Performance, Became A Salesman, Then Gave Voice To 3500 Jingles Before Singing In Films.

गायक केके काळाच्या पडद्याआड:वयाच्या दुस-या वर्षी दिला पहिला स्टेज परफॉर्मन्स, सेल्समन बनले, 3500 जिंगल्सला आवाज दिला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया कसा होता त्यांचा संघर्षमय प्रवास-

बॉलिवूडचे लोकप्रिय गायक केके यांचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. केके कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत होते, दरम्यान त्यांची मंचावरच तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. केके यांनी तडप तडप के, आंखों में तेरी अजब सी, दस बहाने, जरा सी दिल में जगह अशी अनेक उत्तम गाणी गायली. केके यांनी वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी गायला सुरुवात केली, मात्र बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. पण आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी लाखो मनावर अधिराज्य गाजवले.

जाणून घेऊया कसा होता त्यांचा संघर्षमय प्रवास-

केके उर्फ ​​कृष्णकुमार कुन्नथ यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केके यांना त्यांच्या कुटुंबाकडून गायनाचे धडे मिळाले. त्यांच्या घरचे लोक स्टेज शो करायचे, त्यामुळे केके यांना वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. दिल्लीत लहानाचे मोठे झालेले केके यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी एका चांगल्या संगीत गुरूकडून प्रशिक्षण घ्यावे आणि गाण्याची निवड करिअर म्हणून करावी. काही दिवस शास्त्रीय गायन शिकल्यानंतर केके यांनी शिक्षण अपूर्णच सोडले. मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची गाणी ऐकून ते घरीच रियाज करायचे.

केके यांनी त्यांचे शालेय शिक्षण माउंट सेंट मेरी येथून पूर्ण केले आणि त्यानंतर किरोनी मल आणि दिल्ली विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. त्यांना गायनाची आवड होती त्यामुळे ते त्यांच्या मित्रांसोबत कॉलेजमध्ये परफॉर्मन्स देत असत. प्रतिभेच्या जोरावर त्यांना आणखी अनेक कार्यक्रमांमध्ये गाण्याची संधी मिळू लागली.

सहावीत असताना प्रेमात पडले
केके अवघ्या सहावीत असताना क्लासमेट ज्योतीच्या प्रेमात पडले होते. केके खूप लाजाळू होता, पण तरीही त्यांनी ज्योतीला डेट केले. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण ज्योतीचे कुटुंबीय बेरोजगार केकेला तिचा हात द्यायला तयार नव्हते.

लग्न करण्यासाठी सेल्समन झाले

केके सतत स्टेजवर परफॉर्म करत असत, पण घरखर्च भागवणे कठीण होते. ज्योतीशी लग्न करणार अशी चर्चा सुरू असताना तिच्या घरच्यांनी तू नोकरी करशील तरच लग्न होईल, अशी अट घातली. केके यांना एका मित्राच्या मदतीने दिल्लीतील एका खासगी कंपनीत सेल्समनची नोकरी मिळाली. दोघांनी 1991 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत.

पत्नीची साथ मिळाली आणि नोकरी सोडून मुंबई गाठली

लग्नाच्या वेळी केके सेल्समन म्हणून काम करत होते. तीन महिने काम केल्यानंतर आपल्याला हे काम करायचे नाही हे त्यांना समजले. केके यांनी गायनात करिअर करावे अशी पत्नीचीही इच्छा होती. दोघेही काही रुपये घेऊन मुंबईला पोहोचले, तिथे केके यांना तीन वर्षे संघर्ष करावा लागला.

डेमो टेप पाठवली आणि जिंगल गाण्याची संधी मिळाली
संघर्षाच्या दिवसांत केके त्यांचा आवाज रेकॉर्ड करत आणि संगीत कंपनीला टेप पाठवत असत. 1994 मध्ये केके यांनी त्यांच्या आवाजाची टेप लुईस बँक्स, रणजीत बरोट, लेस्ली लुईस यांना पाठवल्या. यूटीव्ही वाहिनीवरून त्यांना पहिला फोन आला. हा कॉल सेंटोजेन सूटिंग एडमधील जिंगलसाठी होता. 1994-1998 पर्यंत केके यांनी 11 भाषांमध्ये सुमारे 3500 जिंगल्सना आवाज दिला.

कसा मिळाला होता बॉलिवूडमध्ये ब्रेक?

एका जाहिरातीसाठी काम करत असताना केके यांना 'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम वो गलियां' या गाण्यात दोन ओळी गाण्याची संधी मिळाली. या दोन ओळींनी प्रभावित होऊन केके यांना ए आर रहमान यांनी 'सपने' चित्रपटाची ऑफर दिली. गाण्यांमध्ये छोटे-मोटे चंक गायल्यानंतर केके यांना 1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला. चित्रपटाचे संगीतकार इस्माईल दरबार यांनी केके यांना चित्रपटातील मुख्य गाणे 'तडप-तडप' गाण्याची संधी दिली. अशा गाण्यांसाठी सहसा ज्येष्ठ गायकांचा आवाज घेतला जात असे, पण इस्माईल यांनी केके यांच्यावर विश्वास दाखवला. चित्रपट प्रदर्शित होताच हे गाणे चार्टबस्टर ठरले आणि केके यांना इंडस्ट्रीत मोठी ओळख मिळाली.

कृष्णकुमार कुन्नथ वरून केके झाले

पहिले गाणे हिट झाले तेव्हा लोकांच्या सांगण्यावरून कृष्णकुमार कुन्नथ यांना KK या नावाने ओळख मिळू लागली. नंतर त्यांनी हेच नाव वापरले.

'पल' म्युझिक अल्बममधून बनले तरुणाईच्या गळ्यातील ताईत
1999 मध्ये केके यांनी लेस्ली लुईस यांच्या दिग्दर्शनाखाली पल हा अल्बम लाँच केला. या अल्बमची गाणी, 'हम रहे या ना रहें कल…' आणि 'यारों दोस्ती…' ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. 'हम रहे या ना रहें कल' हे गाणे केके त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम गाणे मानत असे. योगायोगाने, शेवटच्या स्टेज परफॉर्मन्समध्येही त्यांनी हेच गाणे गायले होते.

11 भाषांमध्ये असंख्य गाणी, परंतु पुरस्कार फक्त 2

केके यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत सुमारे 11 भाषांमध्ये असंख्य गाणी गायली, परंतु त्यांना फक्त दोन गाण्यांसाठी पुरस्कार मिळाले. त्यांना कन्नड गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि 'बचना ए हसीनो'मधील 'खुदा जाने' या गाण्यासाठी दुसरा पुरस्कार मिळाला. त्यांना सुमारे 22 वेळा नामांकन मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...