आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध गायक केके (कृष्णकुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. ते येथे कॉन्सर्टसाठी आले होते. परफॉर्मन्सनंतर हॉटेलमध्ये त्यांची तब्येत बिघडली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
केके यांचा कॉन्सर्ट कोलकाता येथील नजरुल मंच येथे झाला. जिथे त्यांनी त्यांची अनेक लोकप्रिय गाणी गायली, पण 'हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल' हा शेवटचा परफॉर्मन्स ठरला. केकेच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून चाहते भावूक होत आहेत.
35 हजार जिंगल्स गायल्या
केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी केके यांनी जवळपास 35000 जिंगल्स गायल्या आहेत.
'पल' अल्बममधून गायनाची सुरुवात
2021 मध्ये, केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान, केके यांनी भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही दिसले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
या वृत्ताशी संबंधित आणखी बातम्या येथे वाचा -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.