आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तेथे त्याला आणि त्याचा साथीदार रयान थारप यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच्याविरूद्ध आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. या प्रकरणात आता गायक मिका सिंग याची प्रतिक्रिया समोर आली आहे. यासोबतच मिकाने आपल्याला राज कुंद्राचे अॅप पाहिल्याचेही सांगितले आहे.
राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती आहे
मिका सिंगचा पापाराजीसोबत बोलतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मिका सिंग म्हणाला की, ‘या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहूया. जे काही होणार ते चांगलेच होणार. मला त्याच्या अॅपविषयी फार काही माहिती नाही. मी ते अॅप पाहिले होते. ते एकदम सिंपल अॅप होते. त्या अॅपमध्ये फार काही नव्हते. त्यामुळे जे काही होईल ते चांगले होईल अशी अशा करुया. माझ्या माहितीप्रमाणे राज कुंद्रा खूप चांगला व्यक्ती आहे. खरं आणि खोटं काय आहे हे कोर्टच आपल्याला सांगू शकते.’
शिल्पा शेट्टीची होऊ शकते चौकशी
राज कुंद्रा प्रकरणी मिका सिंगपूर्वी पूनम पांडे, गहाना वशिष्ठ, कंगना रनोट आणि राखी सावंत यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात काहीजण राजला पाठिंबा देत आहेत, तर बरेचजण त्याच्याविरूद्ध बोलत आहेत. राज कुंद्रा सध्या भायखळा तुरुंगात आले. कोठडी सुनावल्यानंतर पोलिस आरोपींना येथे ठेवून त्यांची चौकशी करतात. या प्रकरणात पोलिस शिल्पा शेट्टीचीही चौकशी करु शकतात. कारण शिल्पा बहुतेक व्यवसायात पती राज कुंद्राची भागीदार आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच चौकशीसाठी शिल्पाला समन्स बजावू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.