आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीती मोहनच्या मुलाची पहिली झलक:गायिकेने सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो, म्हणाली - आर्यवीरने आमची आईवडील म्हणून निवड केली आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 जूनला नीतीने मुलाला जन्म दिला.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नीती मोहन आणि तिचा पती-अभिनेता निहार पंड्या अलीकडेच आईबाबा झाले आहेत. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता नीतीने आपल्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याचसोबत नीतीने त्यांच्या मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. नीतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चार फोटो शेअर केले असून यात निहारसुद्धा आहे. दोघांनी आपल्या लाडक्या लेकाचे नाव आर्यवीर ठेवले आहे.

नीतीने मुलाचे नाव ठेवले आर्यवीर
नीतीने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीती आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचे दिसतंय. तर एका फोटोत निहार आणि नीतीने मुलाला मांडीवर घेतले आहे. हे फोटो शेअर करत नीतीने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. 'या नाजूक हातांना पकडणे हे आता पर्यंतचे सर्वात सुंदर क्षण आहेत. आर्यवीरने आम्हाला आई-वडील म्हणून निवडले आहे. याहून चांगले आशिर्वाद काय असणार. त्याने आमच्या आयुष्यात आनंद वाढवलायं.'

सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
नीती मोहनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने म्हणाली, 'तुमच्या सारख्या दोन सुंदर व्यक्तींना माझ्याकडून शुभेच्छा.' याशिवाय नीतीटी बहीण मुक्ती मोहन, अभिनेत्री मौनी रॉय, पंखुडी अवस्थी आणि अपारशक्ति खुराना यांनी देखील नीतीच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवशी दिली होती गुड न्यूज
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निहार आणि नीती यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. या खास दिवशी त्यांनी काही फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली होती. नीतीने लिहिले होते , "1 +1 = 3 आई आणि बाबा होणार आहोत. हे सांगण्यासाठी आमच्या दुस-या वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस उत्तम असेल', अशा आशयाचे कॅप्शन नीतीने दिले होते. निहार आणि नीती यांचे 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...