आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलेब्स:सुप्रसिद्ध गायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक, कोरोनाची लागण झाल्यानंतर आयसीयूत शिफ्ट

चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 ऑगस्टला व्हिडिओद्वारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती

बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपल्या आवाजाने लोकप्रिय करणारे आणि 90 च्या दशकात एकापेक्षा एक हीट गाणे देणारे जेष्ठ गायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांची तब्येत अचानक बिघडली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मागील 9 दिवसांपासून चेन्नईतील हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. आता अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने 74 वर्षीय एसपीबी यांना आयसीयूत शिफ्ट करण्यात आले आहे.

एसपीबी यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालासुब्रमण्यम आहे. तसेच, बालू या टोपन नावाने ओळखल्या जाणाऱ्या एसपीबी यांनी 16 भाषांमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त गाणे गाण्याचा रेकॉर्ड केला आहे. 2011 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एस.पी. बालासुब्रमण्यम हे नाव संगीत क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केले. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 90 च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिलं जातं.

5 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली

एसपीबी यांना 5 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. पण, अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी आयसीयूत हालवण्यात आले. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

5 ऑगस्टला व्हिडिओद्वारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती

मी ठिक आहे मला कॉल करु नका

व्हिडिओत एसपी म्हणाले होते, “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला'', असे त्यांनी सांगितले होते. घरी क्वारंटाइनमध्ये राहिल्यास कुटुंबीय अधिक चिंतेत राहतील म्हणून बालसुब्रमण्यम यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतले होते. या व्हिडिओत बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या मित्रांना कॉल न करण्याची विनंती केली होती.

हे सेलिब्रिटीही सापडले होते कोरोनाच्या विळख्यात

एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि त्यातून सुखरुप बाहेर पडले. यात बच्चन कुटुंब, अनुपम खेर यांचे कुटुंब, मोरानी कुटुंब, किरण कुमार, कनिका कपूर, पार्थ समथान, राजामौली यांचे कुटुंब, मोहना सिंह, जगन्नाथ निवंगुणे, श्रेनू पारीख यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...