आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:गर्दी पाहून केके यांनी कारमधून बाहेर येण्यास नकार दिला होता, केकेंसोबत परफॉर्मन्स देणा-या गायिकेचा खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभालक्ष्मी यांनी सांगितली त्या संध्याकाळची हकीकत

बॉलिवूडचे दिग्गज गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ ​​केके हे आता आपल्यात नाहीत. केके यांचे मंगळवारी 31 मे रोजी रात्री कोलकाता येथे निधन झाले. केके यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांपासून ते सेलेब्सपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान एका मुलाखती 31 मे रोजी केके यांच्यासोबत परफॉर्म करणा-या गायिका शुभालक्ष्मी डे हिने काही खुलासे केले आहेत.

शुभालक्ष्मी यांनी सांगितली त्या संध्याकाळची हकीकत
शुभालक्ष्मी म्हणाल्या, केके यांच्या आगमनाच्या वेळी सभागृहाबाहेर मोठी गर्दी होती. केके सायंकाळी साडेपाच वाजता तेथे पोहोचले होते. गर्दी पाहून त्यांनी म्हटले होते की, जर आयोजक गर्दी हटवू शकले नाहीत, तर मी गाडीतून बाहेर येणार नाही, असे केकेंनी स्पष्ट सांगितले होते, असा खुलासा शुभालक्ष्मी यांनी केला.

केकेने यांनी स्टेजचे लाइट्स बंद करायला सांगितले होते

शुभालक्ष्मी पुढे म्हणाल्या, "हॉल खचाखच भरलेला असताना आपल्याला घाम फुटणे ही एक सामान्य गोष्ट आहे. एकदा परफॉर्मन्सच्या वेळी त्यांनी स्टेजवरील प्रकाश मंद करण्यास सांगितले होते. पण, जर त्यांनी सांगितले असते की त्यांना अस्वस्थ वाटत आहे, तर आम्ही शो थांबवला असता."

के.के यांना देण्यात आला राजकीय सन्मान
पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी कोलकाता येथे राजकीय सन्मानाने केके यांना श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी त्यांची पत्नी ज्योती कृष्णा, मुलगा नकुल आणि मुलगी तामारा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथील रबींद्र सदनात पोहोचून केके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते.

केके यांनी हिंदी-तामिळसह 11 भाषांमध्ये गाणी गायली

23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या होत्या.

'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
केके यांनी बॉलिवूडमध्ये 'माचीस' या चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय केके यांनी 'यारो', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवरापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत.

2000 मध्ये केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'पल' या म्युझिक अल्बममधून गायनाची केली होती सुरुवात
2021 मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...