आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Rhea Chakraborty Father Update | Sushant Singh Rajput Death Case 13th Day CBI Investigation Today Latest Update: Rhea Chakraborty Father Indrajit Chakraborty News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा 13 वा दिवस:रियाच्या वडिलांची दुसर्‍या दिवशी पुन्हा चौकशी सुरु, भाऊ शोविकवर वडिलांसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप; एनसीबीकडून एका ड्रग डीलरला अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुत्रांच्या माहितीनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी करणा-या सीबीआयला अद्याप हत्येचा पुरावा मिळालेला नाही.
 • सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि एनसीबी करीत आहेत.
 • 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह वांद्रेतील राहत्या घरी पंख्याला लटकलेला आढळला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचा आज 13 वा दिवस आहे. आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना सीबीआय चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ते सीबीआय कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी मंगळवारी सीबीआयने रियाच्या आईवडिलांची सुमारे 8 तास चौकशी केली. आज केंद्रीय अन्वेषण यंत्रणा सुशांतच्या घरी काम करणारे सदस्य आणि आणि रियाच्या वडिलांना समोरासमोर बसवून प्रश्नोत्तरे करु शकते.

 • नार्कोटिक्सकडून ड्रग्ज प्रकरणात एकाला अटक

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी अमली पदार्थ विक्रेत्यास अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, हा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीशी संबंधित आहे. आज एनसीबी टीमकडून शोविकची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. एनसीबीच्या पथकाने ड्रग्स पेडलर रात्री उशिरा मुंबईच्या अंधेरी भागातून ताब्यात घेतले. त्याची सध्या चौकशी केली जात आहे.

 • शोविकवर वडिलांसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप

टाईम्स नाऊ वाहिनीच्या वृत्तानुसार, शोविक आणि ड्रग्ज सप्लायर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून शोविकने त्याच्या वडिलांसाठी ड्रग्ज मागवल्याचे समोर आले आहे. इंद्रजित चक्रवर्ती यांना आपल्या दोन्ही मुलांच्या ड्रग्ज व्यसनाबद्दल माहित असल्याचेही या चॅटवरुन उघड झाले आहे. इतकेच नाही तर स्वतः इंद्रजित हे देखील ड्रग्ज घेत होते.

या चॅटसंदर्भात सीबीआयकडून इंद्रजित यांची चौकशी केली गेली. मंगळवारी जेव्हा सीबीआयने त्यांची चौकशी केली होती, तेव्हादेखील त्यांना यासंदर्भात विचारणा झाली होती. या चौकशी दरम्यान त्यांनी सीबीआयशी वाद घालण्यास सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

 • सीबीआयने तपासाची दिशा बदलली

सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणा-या सीबीआयला अद्याप हत्येचा पुरावा मिळालेला नाही. सीबीआयचे पथक आता आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या दिशेने चौकशी करेल.

 • सुशांत प्रकरणात कुणाची किती तास चौकशी झाली
पात्रकिती तास झाली चौकशी ?
रिया चक्रवर्ती35
शोविक चक्रवर्ती44
इंद्रजित चक्रवर्ती08
संध्या चक्रवर्ती08
सिद्धार्थ पिठानी104
संदीप श्रीधर9+
श्रुती मोदी20+
नीरज सिंह98
सॅम्युअल मिरांडा69
दीपेश सावंत58