आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल येत्या 30 ऑक्टोबर रोजी बोहल्यावर चढणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गौतम किचलूबरोबर मुंबईत एका छोटेखानी समारंभात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे काजलने सांगितले आहे.
आपल्या पोस्टमध्ये काजलने लिहिले, '30 ऑक्टोबर 2020 रोजी मी गौतम किचलूसोबत मुंबईत लग्न करणार आहे. या खासगी आणि छोटेखानी सोहळ्यात फक्त आमच्या कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील.'
View this post on InstagramA post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on Oct 5, 2020 at 10:56pm PDT
लग्नाची घोषणा करण्यापूर्वी काजल या पोस्टमुळे चर्चेत आली होती. रिपोर्ट्सनुसार गेल्या महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.
View this post on InstagramA post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on Oct 5, 2020 at 5:19am PDT
कोण आहे गौतम किचलू?
रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोरशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे. तर काजल सिंघम, स्पेशल 26, मगधीरा अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे.
View this post on InstagramA post shared by Gautam Kitchlu (@kitchlug) on Jan 18, 2020 at 11:44pm PST
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.