आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा विशेष:कंगनाच्या चित्रपटात दिसेल सीतेचे एक वेगळे रुप, वनवास-सीताहरण किंवा राम-रावण युद्ध दाखवले जाणार नाही, स्वयंवरावर संपणार चित्रपटाचे कथानक

मनीषा भल्ला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्ज प्रकरणामुळे दीपिकाला सीतेची भूमिका मिळाली नाही
  • आलियाने तिची भूमिका लहान असल्यामुळे चित्रपट नाकारला

मोठ्या पडद्यावर माता सीतेच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'सीता-द इंकार्नेशन' या चित्रपटात अभिनत्री कंगना रनोट मुख्य भूमिका साकारत असून यात सीतेला योद्धा म्हणून दाखवले जाईल. सीता धनुर्विद्यासह अनेक शस्त्रे चालवताना दिसेल. हा चित्रपट पूर्णपणे सीतेच्या पात्रावर आधारित आहे आणि यात सीतेच्या स्वयंवराची कथा आहे.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिके दीपिका चिखलिया सीतेच्या पारंपारिक रूपात दिसली होती. पण, 'सीता-द इंकार्नेशन'मध्ये सीतेची प्रतिमा वेगळ्या पद्धतीने सादर केली जाईल. बालपणापासून ते स्वयंवरापर्यंतची कथा या चित्रपटात असेल. वनवास, सीता हरण, राम-रावणाचे युद्ध हे या चित्रपटात दाखवले जाणार नाही.

फक्त स्वयंवरापर्यंतची आहे कहाणी

'सीता'चे निर्माते प्रेम जोशी सांगतात की, हा बहुधा पहिला चित्रपट असावा ज्यात चित्रपटाचे संपूर्ण कथानक केवळ सीतेवर केंद्रित आहे. यात सीतेचे बालपण, तारुण्य, गुरुकुल आणि स्वयंवराची कथा असेल. येथे सीतेची ओळख मिथिलाची राजकुमारी म्हणून केली जाईल. सीतेला गुरुकुलमध्ये अभ्यासासाठी पाठवले गेले होते हे चित्रपटात दाखवले जाईल. तिथे सीतेने सर्व शास्त्रे आणि शस्त्रे शिकली. या चित्रपटाची पटकथा 'बाहुबली', 'बजरंगी भाईजान' आणि 'मणिकर्णिका'चे लेखक व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. संवाद मनोज मुंतशीर यांचे असतील. चित्रपटाचे बजेट सुमारे 150 कोटी आहे.

आलियाला होती पहिली पसंती, पण तिला अधिक स्क्रीन वेळ हवा होता

प्रेम जोशी यांनी सांगितले की, 'सीता'च्या मुख्य पात्रासाठी आलिया भट्टला निर्मात्यांची पहिली पसंती होती. आलियासोबत दोनदा नरेशन झाले होते. पण तिची एक अट होती, ती म्हणजे चित्रपटातील सीतेची बालपणीची दृश्ये कमी करावीत आणि तारुण्यातील दृश्ये वाढवली जावी. निर्माते स्क्रिप्टमध्ये कोणताही बदल करण्यास तयार नव्हते. शेवटी, ती चर्चा तिथेच संपुष्टात आली होती.

दीपिकाला होती दुसरी पसंती
या पात्रासाठी दीपिका पदुकोण ही दुसरी पसंती होती. पण तिचच्याबरोबर चित्रपटासाठी कोणतेही नरेशन झाले नव्हते. याच दरम्यान ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव पुढे आले होते. अशा वातावरणात दीपिकाला सीतेच्या भूमिकेत कास्ट करणे कठीण झाले. त्यामुळे तिचे नाव वगळण्यात आले.

करीनाशी चर्चा झालीच नव्हती
प्रेम जोशी यांनी सांगितले की, करीना कपूरचा या चित्रपटासाठी कधीही विचार केला गेला नव्हता. 12 कोटी मानधन न मिळाल्याने करीनाने हा चित्रपट सोडला, या चर्चेत काहीच तथ्य नाहीये. याच निर्मात्यांनी करीनाकडे एका ऐतिहासिक बायोपिकसाठी संपर्क साधला होता. पण, करीना त्या ऐतिहासिक पात्रासाठी तयार नव्हती, त्यामुळे गोष्टी पुढे गेल्या नाहीत.

सीता एक वीरांगणा होती, ती धनुष्य सहज उचलून घ्यायची

इतिहासकार आणि लेखिका डॉ. उषा किरण खान सांगतात, आपल्या ग्रंथांमध्ये असे अनेक पुरावे आहेत की, ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयी आश्रम चालवत असत आणि सीतासह अनेक मुली गुरुकुलात जात असत. ती एक वीरांगणा होती. कोणत्याही अडचणीला ती धैर्याने तोंड देत असे.

सीता आपल्या एका हाताने सहज धनुष्य उचलत असे, जे मोठ्या योद्ध्यांनाही शक्य नव्हते. ती शारीरिकदृष्ट्या एवढी मजबूत होती की तिला धनुष्य कसे उचलायचे हे माहित होते. धनुष्यावर तार बांधण्याचे कठीण काम सीता सहज करू शकत होती. हे पाहून वडील जनक यांना वाटले की, सीतेचे लग्न एका पराक्रमी योद्ध्याशीच व्हावे.

मिथिला कला कौशल्यांचा एक गड होता. युद्धाव्यतिरिक्त सीता इतर सर्व कलांमध्ये पारंगत होती. सीता स्वयंपाक करण्यातही पारंगत होती. प्रभू राम जिथे जिथे गेले होते, तिथे सीता रसोई आढळते.

बातम्या आणखी आहेत...