आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न ऐकलेल्या कथासितारा देवी यांचा जन्म होताच आई-वडिलांनी नाकारले होते:चेहरा वाकडा असल्याने मोलकरणीने वाढवले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सितारा देवी यांचे न ऐकलेले किस्से -

सितारा देवी... ज्यांना ठाकूर रवींद्रनाथ टागोर यांनी कथ्थक क्वीन असे नाव दिले. त्यांचा जन्म होताच चेहरा वाकडा असल्यामुळे घरच्यांनी त्यांला सोडून दिले. 8 वर्षांनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या डान्सचा फोटो वर्तमानपत्रात पाहिल्यावर त्यांला घरी आणले. वयाच्या 8 व्या वर्षी लग्न झाले, परंतु बंडखोर वृत्तीने शिक्षणासाठी सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. परिणामी लग्न मोडले.

सितारा देवींनी एकुण चार विवाह केले, पण त्यांचे एकही लग्न टिकले नाही. दोन लग्नांना दुःखाची किनार होती. नव-याने केलेल्या फसवणुकीने त्या पुरत्या कोलमडल्या होत्या. पण त्यांनी त्यांच्या दुःखाला त्यांच्या कथ्थकवर कधीही वरचढ होऊ दिले नाही, कथ्थकसाठी त्यांनी आपली फिल्मी कारकीर्दही सोडली. 1991 मध्ये जेव्हा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सितारा देवींनी भारतरत्नापेक्षा कमी कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही, असे सांगत पद्मभूषण नाकारला होता.
आजच्या न ऐकलेल्या किश्श्यांमध्ये वाचा भारताची कथ्थक क्वीन सितारा देवी यांची कहाणी...

जन्माच्या वेळी चेहरा वाकडा होता त्यामुळे आई-वडिलांनी मोलकरणीकडे सोडले

8 नोव्हेंबर 1920 ची गोष्ट आहे, जेव्हा वाराणसीतील ब्राह्मण सुखदेव महाराजांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. हा दिवस धनत्रयोदशीचा होता, दिवाळीच्या एक दिवस आधी, म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव धनलक्ष्मी देवीवरून धनलक्ष्मी ठेवले. मुलीचा चेहरा लहानपणी वाकडा होता, त्यामुळे सुखदेव यांनी नाखूष होऊन तिला आपल्या मोलकरणीकडे सोपवले. मोलकरणीने रात्रंदिवस सेवा केली तेव्हा मुलीचा चेहरा सुधारला. मुलीच्या चेहऱ्यात सुधारणा झाल्यानंतर वयाच्या 8 व्या वर्षी आई-वडील तिला घेऊन जाण्यास तयार झाले. लहानपणी नाकारलेली धनलक्ष्मी काशीच्या कबीरचौरा गल्लीतून बाहेर पडेल आणि देश-विदेशात स्टार बनून खूप नाव कमावेल, हे कुणास ठाऊक होते.

सितारा देवी यांचे वडील सुखदेव महाराज ब्राह्मण, संस्कृत विद्वान आणि नेपाळच्या राजदरबाराचे सेवक होते. नेपाळ दरबारात असताना सुखदेव महाराजांना शास्त्रीय नृत्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. येथेच त्यांचा विवाह नेपाळ न्यायालयाच्या राजघराण्यातील मत्यास कुमारी यांच्याशी झाला होता, ज्यांच्यापासून त्यांना अलकनंदा, तारा, धनलक्ष्मी आणि दोन मुले चौबे आणि पांडे ही अपत्ये झाली.

नृत्य शिकल्याने तवायफसोबत झाली तुलना
भारतीय शास्त्रीय नृत्याला चालना देण्यासाठी सुखदेव यांनी सितारासह त्यांच्या पाच मुलांना कथ्थक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हा 1930 चा काळ होता जेव्हा कथ्थक फक्त तवायफ करत असे. सभ्य कुटुंबातील मुलींना कथ्थक करण्याची परवानगी नव्हती, पण सुखदेव यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचलले. एक, ब्राह्मण कुटुंब समाजाच्या विरोधात गेले, वरून नाच-गाणे सुरू झाले आणि त्यांच्या मुलींना तवायफ म्हटले जाऊ लागले.

लोकांनी आक्षेप घेतल्यावर त्यांच्या कुटुंबाला घर सोडावे लागले. बनारसमधील कबीरचौरा येथे हे कुटुंब राहायला आले. घर बदलल्यानंतर सुखदेव यांनी शास्त्रीय नृत्य शिकवण्यासाठी शाळा सुरू केली आणि त्यात धार्मिक माहिती दिली, ज्यामुळे त्यांचे नृत्य तवायफ नृत्यापेक्षा वेगळे वाटू लागले. समाजाने टोमणे मारले, पण सितारा बहिणींसोबत नृत्य शिकत राहिल्या.

शाळेत जाण्याच्या हट्टापायी 8 वर्षीय सिताराने स्वतःचे लग्न मोडले

वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी सिताराचा बालविवाह झाला होता, पण लग्नानंतर सिताराने शाळा सोडावी, अशी तिच्या सासरच्यांची इच्छा होती. सिताराच्या शाळेत जाण्याच्या आग्रहावरून तिच्या वडिलांनी लग्न मोडून तिला बनारसच्या कामच्छागढ हायस्कूलमध्ये दाखल केले. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेवर नृत्य सादरीकरण होणार होते.

जेव्हा सिताराने आपले कौशल्य दाखवले तेव्हा शिक्षक इतके प्रभावित झाले की सर्व मुलांना नृत्य शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली. जेव्हा सिताराने स्टेजवर परफॉर्म केले तेव्हा पाहणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्थानिक वर्तमानपत्रात सिताराच्या नृत्याचे खूप कौतुक झाले.

वर्तमानपत्रात मुलीची बातमी वाचली, तेव्हा वाकड्या चेहऱ्यावर अभिमान वाटला

वडिलांनी वर्तमानपत्र जेव्हा मुलीबद्दल वाचले तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलला. ज्या मुलीला त्यांनी वाकड्या तोंडामुळे लहानपणी सोडून दिले होते, तीच आज वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन बनत होती. त्यांनी आपल्या मुलीचे नाव धनलक्ष्मीहून सितारा देवी ठेवले आणि मोठी बहीण तारासोबत कथ्थकते धडे द्यायला सुरुवात केली. आपल्या बहिणीसोबत नृत्याचे धडे गिरवत सितारासुद्धा नृत्यात पारंगत झाली. डान्स आवडू लागल्याने सिताराने शाळा सोडली.

वयाच्या 10 व्या वर्षी ती इंटरव्हलमध्ये देत असे 15 मिनिटे परफॉर्मन्स
1930 च्या दशकात, चित्रपटांमध्ये 15 मिनिटांचा इंटर्व्हल असायचा, ज्यामध्ये डान्सर्स लोकांचे मनोरंजन करत असे. सितारा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. वयाच्या 11 व्या वर्षी, सितारा यांचे कुटुंब वाराणसीहून मुंबईत स्थलांतरित झाले होते, जिथे त्या कथ्थक परफॉर्मन्स द्यायच्या.

अथिया बेगम पॅलेसमध्ये रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू आणि कावसजी जहांगीर यांच्यासमोर सितारा यांनी कथ्थक सादरीकरण केले. रवींद्रनाथांनीच त्यांना टाटा पॅलेसमध्ये एक विशेष कार्यक्रम देण्यास सांगितले. टाटा पॅलेसमध्ये 12 वर्षीय सिताराच्या 3 तासांच्या परफॉर्मन्सने खूश होऊन रवींद्रनाथांनी त्यांना 50 रुपये रोख आणि शाल देऊन सन्मानित केले होते. त्यांचे नाव मुंबईत होऊ लागले. सितारा देवीबद्दल चित्रपटसृष्टीही चर्चा होऊ लागली.

तवायफांना कथ्थक येत नव्हते, त्यामुळे सितारा देवी यांना चित्रपटात काम मिळाले

सितारा देवी यांनी स्वत: एका मुलाखतीत चित्रपटात येण्याच्या किश्श्याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या- दिग्दर्शक निरंजन शर्मा आपल्या 'उषाहरण' चित्रपटासाठी एका तरुण कथ्थक डान्सरच्या शोधात होते. ते बनारसच्या अनेक तवायफांना भेटले, पण त्यातले बहुतेक हिंदू होते, ज्या शास्त्रीय नृत्याविषयी अनभिज्ञ होत्या.

जेव्हा निरंजन तवायफ घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सिद्धेश्वरी देवीला भेटले तेव्हा त्यांनी निरंजन यांना सितारा यांचे नाव सुचवले. निरंजन सुखदेव यांच्या नृत्यशाळेत पोहोचले तेव्हा 12 वर्षांच्या सिताराच्या नृत्यावर खूश होऊन त्यांना ती ऑफर दिली.

1933 मध्ये बनलेला हा चित्रपट सितारा यांचा पहिला चित्रपट होता जो 1940 मध्ये प्रदर्शित झाला होता. याआधीही 'शहर का जादू' (1934) हा त्यांचा डेब्यू चित्रपट ठरला होता. पदार्पणानंतर, सितारा यांनी जवळपास 23 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.

मंटोसमोर तलवार फिरवत इशारा दिला होता

सआदत हसन मंटो हे त्या काळातील प्रसिद्ध लेखक होते, जे मोठ्या व्यक्तींबद्दल लिहायचे. सितारा देवी लहान असताना मंटो त्यांचे इतके मोठे चाहते होते की ते सितारा यांना रोज सराव करताना पाहण्यासाठी घरी पोहोचायचे. सितारा जेव्हा त्यांच्या वडिलांकडे तक्रार करायच्या तेव्हा ते म्हणायचे की, ते खूप मोठा लेखक आहे, ते तुझ्याबद्दल मोठ्या वर्तमानपत्रात छापतात.

16 वर्षीय सिताराला मंटो यांचे दररोज येणे आवडत नव्हते. एके दिवशी मंटो न बोलावता आले तेव्हा सितारा यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. पुढच्या वेळी पुन्हा मंटो फुले आणि मिठाई घेऊन आले आणि सितारा यांच्याशी बोलू लागले, तेव्हा सितारा तलवारीसोबत सराव करत होत्या. समजावूनही मंटो शांत बसले नाही, तेव्हा सितारा यांनी त्यांच्याजवळ तलवार फिरवून सराव सुरू केला, ज्यामुळे ते घाबरला. हा धाडसी सिताराचा इशारा देण्याची पद्धत होती.

(हा किस्सा सितारा देवी यांची मुलगी जयंती यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.)

कथ्थकसाठी चित्रपट कारकिर्दीचा त्याग केला

'मदर इंडिया' हा शेवटचा चित्रपट होता ज्यामध्ये सितारा देवी यांनी नृत्यांगना म्हणून काम केले होते. या चित्रपटात त्यांनी मुलाच्या वेशभूषेत होळीच्या गाण्यावर नृत्य केले होते. जेव्हा चित्रपटांमध्ये काम केल्याने त्यांच्या कथ्थकवर परिणाम होऊ लागला तेव्हा त्यांनी चित्रपटात काम करणे कायमचे सोडले. शास्त्रीय नृत्यासाठी आपल्या चित्रपट कारकिर्दीचा त्याग करणा-या त्या पहिल्या कलाकार होत्या.

कथ्थकला लंडन, न्यूयॉर्कमध्ये घेऊन जाणा-या सितारा

चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर सितारा यांनी बनारस घराण्याचे कथ्थक भारतासह परदेशात घेऊन गेल्या. 1967 मध्ये सितारा यांना लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आणि 1976 मध्ये न्यूयॉर्कच्या कार्नेगी हॉलमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. त्यांनी जगभरातील मोठ्या देशांमध्ये अनेक वेळा कथ्थक सादर केले. त्यांचे मोठे स्टेज शो व्हायचे.

यश मिळाले, पण सितारा प्रेमाच्या शोधात होत्या
सितारा देवी यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम नव्हते. लहानपणी त्यांचे पहिले लग्न श्री देसाई यांच्याशी झाले होते, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. स्वत: सितारा देवी यांनी अभ्यासासाठी हे लग्न मोडले. यानंतर सितारा यांनी 1956 मध्ये वयाच्या 16 वर्षी अभिनेते नजीर अहमद खान यांच्याशी दुसरे लग्न केले.

खरं तर सितारा त्यावेळी नजीर यांच्या हिंद पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची पार्टनर बनली होती. एकत्र काम करत असताना दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. नजीर यांचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे दोघांचे नाते बरेच वादात सापडले होते. समाजाने या दोघांमधील संबंध अवैध म्हटले. लग्नाला न्याय देण्यासाठी सितारा यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

के. आसिफ यांच्यासोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे लग्न तुटले

नजीर यांचे भाचे के. असिफ (मुघल-ए-आझमचे दिग्दर्शक) प्रोडक्शनमध्ये मदत करण्यासाठी वारंवार स्टुडिओत जात असे. इथे त्यांची भेट सितारा यांच्याशी व्हायची. सितारा यांना स्टुडिओत काम करण्यासाठी पैसे मिळत नसायचे. त्यामुळे त्या नजीरवर नाराज होत्या. तर के. आसिफसुद्धा त्यांचे मामा नजीर यांच्यावर नाराज असायचे. स्टुडिओमध्ये नजीर आणि सितार यांच्यात मैत्री झाली आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले.

दुसरीकडे, नजीर यांना के. आसिफ यांचे दररोज स्टुडिओत पोहोचून पत्नीशी बोलणे खटकू लागले होते. त्यांनी दारातच शिंप्याचे दुकान उघडले, जेणेकरून के. आसिफ आणि सितारा यांची भेट होऊ नये. परंतु तरीही सितारा आणि के. आसिफ जवळ आले. नंतर सितारा देवी यांनी नजीर यांना घटस्फोट दिला आणि नजीर यांच्याशी घटस्फोट घेऊन के. आसिफ यांच्याशी 1944 मध्ये कोर्ट मॅरेज केले.

केवळ दोन वर्षांनी के. आसिफ यांनी दुसरे लग्न केले

सितारा यांच्यासोबतच्या लग्नानंतर दोन वर्षांनी के. आसिफ लाहोरला गेले आणि त्यांनी दुसरे लग्न केले, त्यामुळे सितारा खूपच दुःखी झाल्या. सितारा म्हणायच्या, के. असिफ हे अतिशय मृदू, सौम्य आणि प्रगतीप्रेमी होते आणि माझी काळजीही घेत असे.

जेव्हा सितारादेवीची मैत्रीणच झाली त्यांची सवत
सितारा यांनी 40 च्या दशकात के आसिफ यांच्याशी तिसरे लग्न केले होते. के. आसिफ यांनी त्यांच्या मुघल-ए-आझम चित्रपटातील 'तेरी मेहफिल में किस्मत' या गाण्यात सितारा देवीच्या सांगण्यावरून त्यांची मैत्रीण निगार हिला मधुबालासोबत काम करण्यासाठी घेतले. काही काळाने के आसिफ यांनी निगारला लग्न करुन घरी आणले. आता सितारा यांची मैत्रीण त्यांची सवत झाली होती. या घटनेने सितारा यांना धक्का बसला होता, पण त्यांनी के. आसिफ यांच्याशी संबंध तोडले नाहीत.

सितारा आणि के. आसिफला मूलबाळ नव्हते, पण सितारा यांनी निगार यांच्या मुलांवर खूप प्रेम होते. वडीलधाऱ्यांमध्ये मुलांचा दोष नसतो असे त्या म्हणायच्या. त्यांची मुलगी जयंतीमाला यांनी फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सितारा देवी यांनी त्यांच्या पतीच्या फसवणुकीचा निगारसोबतच्या मैत्रीवर कधीही परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी आपला राग आणि वेदना नृत्यातून मांडल्या.

जेव्हा पतीने दिलीप कुमार यांच्या बहिणीशी तिसरे लग्न केले तेव्हा सितारा कोलमडल्या होत्या
सितारा आणि निगार असूनही, के. आसिफ अख्तर यांच्याशी लग्न करून त्यांना घरी आणले. अख्तर या दिलीप कुमार यांची सख्खी बहीण होती. अख्तर यांच्यावर दिलीप साहेबांचा खूप जीव होता. पण के. आसिफ आणि अख्तर यांच्या लग्नाने दिलीप साहेबांना मोठा धक्का बसला आणि दिलीप साहेबांनी आपल्या बहिणीसोबतचे सगळे नाते संपुष्टात आणले. त्यांना एवढा राग आला होता की, ते मुगल-ए-आझमच्या प्रीमिअरलासुद्धा गेले नव्हते.

सितारा देवी दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. दिलीप साहेबांपेक्षा सितारा देवी यांना जास्त राग आला होता. घरात बरीच भांडणे झाली आणि शेवटी सितारा के. आसिफ यांच्या घरातून निघून गेल्या. सितारा घरातून निघताना के. आसिफ यांना म्हणाल्या होत्या की, मी तुझा मेलेला चेहराही पाहणार नाही. पण 9 मार्च 1971 रोजी संजीवकुमार यांच्या घरी के. आसिफ यांचे निधन झाले, तेव्हा सितारा यांनी आपली शपथ मोडली आणि पत्नी म्हणून सर्व विधी पार पाडले होते.

चौथे लग्नही झाले, पण तेही टिकले नाही

1958 मध्ये एका कार्यक्रमानिमित्त सितारा देवी दक्षिण आफ्रिकेतील दारेस्सलाम येथे गेल्या होत्या, जिथे अनेक गुजराती कुटुंबे स्थायिक होती. सितारा यांच्या मुक्कामाची व्यवस्था एका गुजराती कुटुंबाने केली होती, तिथे त्यांचा मुलगा प्रताप बारोट यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. प्रताप बारोट हे लंडनमध्ये स्थायिक झालेले ब्रिटिश एअरवेजचे अभियंते होते. मैत्री वाढल्यावर दोघांनी लग्न केले. या लग्नातून त्यांना पहिला मुलगा रणजीत बारोट आणि मुलगी जयंतीमाला झाली, पण 1970 पर्यंत दोघेही वेगळे झाले.

अपमान म्हणून पद्मभूषण पुरस्कार नाकारला

2002 मध्ये सितारा देवी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र त्यांनी हा सन्मान घेण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या होत्या - हा माझ्यासाठी सन्मान नसून अपमान आहे. मी दिलेल्या कथ्थकच्या योगदानाची सरकारला जाणीव नाही का? भारतरत्नापेक्षा कमी मानाचा पुरस्कार मी स्वीकारणार नाही. लोक याला सितारा यांचा अहंकार मानतील, पण हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी नेहमी जीवनात सर्वोत्तम शोधले, कारण त्यांनी स्वतःला नेहमीच सर्वोत्कृष्ट दिले होते.

सितारा देवी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर 25 नोव्हेंबर 2014 रोजी जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीला कथ्थकची ओळख करून देणाऱ्या सितारा देवी आज या जगात नाहीत, पण त्यांचे योगदान नेहमीच वाखाणण्याजोगे असेल.

बातम्या आणखी आहेत...