आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Slumdog Millionaire Actor Madhur Mittal Reacts Over The Allegations Of Sexual Assault, Claims Untrue Stories Are Assassinating His Character

लैंगिक छळाच्या आरोपांवर स्पष्टीकरण:'स्लमडॉग मिलेनिअर' फेम मधूर मित्तल म्हणाला - खोट्या गोष्टी सांगून मला बदनाम केले जात आहे, माझ्या घरात मी एकटा कमावणारा आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधूरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला मारहाण केल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता मधूर मित्तलविरोधात लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. जयपूरमध्ये वेब सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करुन मुंबईत परतलेल्या मधूरने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही या सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत असल्याचे तो म्हणाला आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती. 13 फेब्रुवारी रोजी मधूरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला मारहाण केल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले होते.

खोट्या गोष्टी सांगून बदनाम केले जात आहे.
बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना मधूर म्हणाला, या सर्व गोष्टींमुळे माझी प्रतिमा मलीन होत आहे. अनेक कास्टिंग दिग्दर्शकांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. माझ्या बद्दल ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत त्याबद्दल विचार करुन डिस्टर्ब व्हायला होते. माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही स्टोरीज व्हॉट्सअपवरुन पसवरल्या जात आहेत आणि त्या गेल्या आठवड्यापासून अनेक ग्रूपमध्ये फॉरवर्ड केल्या जात आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून माझ्या कुटुंबातील मी एकमेव कमावता व्यक्ती आहे आणि माझ्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे त्याचा परिणाम माझ्यासोबत माझ्या कुटुंबावरही होत आहे,’ असे त्याने म्हटले आहे.

'एका पक्षाचे ऐकून निष्कर्षावर पोहोचू नका'
स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात सलीम मलिकची भूमिका वठवणा-या मधूर मित्तलने लोकांना एका पक्षाचे ऐकून निष्कर्षावर पोहोचू नका, अशी अपील केली आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल, असेही तो म्हणाला आहे.

पीडिता बोलण्याच्या स्थितीत नाही
पीडिताचे वकील निरंजन शेट्टी यांनी सांगितल्यानुसार, ती तरुणी माझ्याशी बोलण्याच्या स्थितीत नाहीये. तिच्या एका मित्राने मला या घटनेविषयी सांगितले. तिच्या डोळे, मान आणि ओठांवर जखमा आहेत. तिला मारहाण आणि लैंगिक छळ झाला आहे. मी पोलिसांना एक पत्र पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले.

15 वेळा गळा आवळण्याचा केला होता प्रयत्न
मधूर आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची भेट डिसेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच मधूरने मद्याच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी या दोघांनी ब्रेकअप केला होता. मात्र, त्यानंतर 13 फेब्रुवारीला मधूरने घरात घुसून तिला मारहाण केली, असे तरुणीच्या वकिलांनी सांगितले.

मधूर खूप जास्त रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट तिच्या घरात घुसला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानाखाली लावल्या. इतकेच नाही तर 15 वेळा त्याने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे केस, कान ओढले. तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

मधुर पुन्हा 15 फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी पोहोचला होता. मात्र पीडितेच्या वकिलाने त्याला तेथून जाण्यास सांगितले होते. मारहाण करुन जखमी करणे आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधूरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...