आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या बिकिनी वादात स्मिता गोंदकरची उडी:केले बोल्ड वक्तव्य, म्हणाली - आता भगव्या रंगाची ब्रा घालायलाही दडपड येतंय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा आगामी 'पठाण' हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन हे वादंग उठले आहे. अनेक हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांनी चित्रपटाला विरोध दर्शवत आहे. इतकेच नाही तर अयोध्येतील एका महतांनी तर शाहरुखला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या वादात मराठी सिनेसृष्टीतील बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्मिता गोंदकरने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या प्रकरणावर व्यक्त झाली.

सकाळ वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतील स्मिताने या वादावर भाष्य केले आहे. तिने भगव्या रंगाच्या बिकिनीवर भाष्य करताना स्वत:ला वाटत असलेली भीतीबदेखील व्यक्त केली.

काय म्हणाली स्मिता गोंदकर?
"भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सध्या वाद सुरू आहे, हे सर्व पाहिल्यानंतर मला आता भीती वाटतेय. हा वाद सुरू झाल्यानंतर सर्वात आधी तर मी माझे वॉर्डरोब चेक केले. माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काय आहे काय नाही, हे तपासले. मला तर आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही भीती वाटतेय. भगव्या रंगाची ब्रा घातल्याचे पाहिल्यांनंतर हे लोक काय करतील, याचा विचार करूनही भीती वाटतेय," असे स्मिताने म्हटले आहे.

दीपिकाला दिला सल्ला
"ज्या भगव्या रंगावरुन वाद सुरु आहे, हा हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हटला जातो. मी दीपिकाला एक सल्ला देईन की, तिने आता हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनीतील फोटो पोस्ट करावा, त्यानंतर हा प्रश्नच मिटेल," असेही स्मिता म्हणाली.

सीनची गरज समजून कलाकारांना कपडे घालावे लागतात
स्मिता पुढे म्हणाली, "सध्या जग जवळ आले आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढतोय. चित्रपटही जागतिक स्तरावर पाहिला जातो. चित्रपटातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात आणि कलाकार त्या कपड्यांत चांगले दिसत असतील तर का घालू नये," असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन जो वाद सुरु आहे, तो पटलेला नाही, असे स्मिता गोंदकर म्हणाली.

25 जानेवारीला प्रदर्शित होतोय चित्रपट
'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. शाहरुख आणि दीपिकाच्या डान्स मूव्हजही बोल्ड आहेत. या गाण्याला शिल्पा रावने आवाज दिला आहे, तर विशाल-शेखरने ते संगीतबद्ध केले आहे. हे गाणे वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केले आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे केवळ 'पठाण'वर बहिष्काराचीच मागणी होतेय.

'पठाण' 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तो हिंदीसोबतच दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि शाहरुखसोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. जॉन खलनायक बनला आहे. या चित्रपटाचा टिझर महिनाभरापूर्वी रिलीज झाला होता. अनेकांना तो आवडला नाही. नेटक-यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'वॉर' आणि 'मार्व्हल्स'ची कॉपी आहे.

बातम्या आणखी आहेत...