आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 26 वर्षे पूर्ण केली आहे. दरम्यान तिचा स्मृती इराणी यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जान्हवी स्मृती इराणींना वारंवार आंटी म्हणते. मात्र, नंतर जान्हवीने आंटी म्हटल्याबद्दल स्मृती इराणी यांची माफीही मागितली.
हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, जान्हवीने त्यांना आधी आंटी म्हणून हाक मारली आणि नंतर माफीदेखील मागितली होती. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी स्मृती इराणींना ट्रोल केले होते.
आटीं म्हटल्यावर स्मृती इराणी म्हणाल्या- ही आज कालची पोर पण ना...
ही 2018 ची घटना आहे. त्यावेळी जान्हवी कपूरची विमानतळावर स्मृती इराणी यांच्याशी अचानक भेट झाली होती. या भेटीचा व्हिडिओ स्मृती इराणी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्मृती इराणी यांनी लिहिले होते - "कोणी तरी मला गोळी मारावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. ज्यावेळी माझी प्रिय जान्हवी कपूर मला आंटी म्हणून बोलवते. आणि ‘कोई बात नही बेटा’ अशी प्रतिक्रिया माझ्याकडून येते. ही आज कालची पोर पण ना!!! #आंटीकिसको बोला," असे विनोदी शैलीत स्मृती म्हणाल्या होत्या.
नेटकऱ्यांनी स्मृती इराणी यांना केले ट्रोल
स्मृती इराणींच्या या कॅप्शनवर सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल केले होते. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले होते - 'तुम्ही राजकारणात का आलात, तुम्ही फक्त टीव्ही मालिकांमध्ये काम करायला हवे होते.' तर आणखी एकाने लिहिले होते – 'आता आंटीला आंटी नाही कर काय म्हणणार.'
काही यूजर्स स्मृती इराणींच्या समर्थनार्थ आले होते पुढे
त्याचबरोबर काही यूजर्सनी स्मृती इराणींच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले होते. एका यूजरने लिहिले होते - 'जान्हवीला त्यांनी बाळा म्हटले, याकडे तुम्ही लक्ष दिले नाही. लोक फक्त आंटी म्हणत कमेंट करत आहेत.'
रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पडाहियासोबत वाढदिवस साजरा करणार जान्हवी
रिपोर्ट्सनुसार, जान्हवी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात गेली आहे. अलीकडेच तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील तिच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाला होता. यासोबत जान्हवीचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरही त्यांच्यासोबत दिसले होते.
जान्हवी कपूरचे आगामी प्रोजेक्ट्स
जान्हवी लवकरच वरुण धवनसोबत नितेश तिवारींच्या 'बवाल' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'दोस्ताना 2' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही'सारखे चित्रपट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.