आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी संध्याकाळी 25 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा जाहिरात व्हिडिओ प्रसिद्ध सॅनिटरी नॅपकिन ब्रँडचा होता, ज्यामध्ये अभिनेत्री पीरियड्सबद्दल अगदी स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना स्मृती म्हणाल्या की, हा त्यांच्या करिअरमधला पहिला मोठा जाहिरातीचा व्हिडिओ होता, पण अशा प्रोजेक्टमुळे मॉडेलचं करिअर संपुष्टात येऊ शकलं असतं.
ही एका उत्पादनाची जाहिरात होती ज्याच्या विरोधात बरेच लोक होते
सॅनिटरी नॅपकिनचा व्हिडिओ शेअर करत स्मृती यांनी लिहिले- 'जेव्हा तुमची पहिली जाहिरात सॅनिटरीची असेल! 25 वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीसाठी ही माझी पहिली जाहिरात होती. तीसुद्धा कोणत्याही फॅन्सी विषयावर नव्हते. उलट, त्यावेळेस ही एका अशा उत्पादनाची जाहिरात होती ज्याच्या विरोधात बरेच लोक होते. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीमध्ये सहभागी असलेल्या मॉडेल्सच्या करिअरचा जवळजवळ अंत झाला होता.
कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी उत्साहित होत्या स्मृत
स्मृती पुढे म्हणाल्या की- 'कॅमेऱ्या समोर माझ्या करिअरची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्साहित होते. मी प्रोजेक्टला हो म्हटलं. शेवटी, मासिक पाळी आणि स्वच्छतेबद्दल का बोलू नये. तेव्हापासून मी मागे वळून पाहिले नाही. PS: होय मी तेव्हा सडपातळ होते, आठवण करून देण्याची गरज नाही.
मासिक पाळीबद्दल स्पष्टपणे बोलल्या स्मृती
या प्रसिद्ध व्हिडिओमध्ये स्मृती महिलांना मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. व्हिडिओमध्ये स्मृती म्हणाल्या की- 'ते 5 दिवस, ते पाच दिवस कोणते आहेत. त्यांना पाच दिवस कशाला म्हणता. अरे यार, माझी पाळी आली आहे. हा काही आजार नाही. हे माझ्या आईसह, तुम्ही आणि जगभरातील लाखो महिलांसह प्रत्येकीबाबत घडते. मग महिलांना सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून मदत का होत नाही. पीरियड्समुळे कळते आपण मोठे होत आहोत, मॅच्युअर होत आहोत. मग त्याला पाच दिवस कशाला म्हणायचे?'
युझर्स म्हणाले- 'लोक आजही अशा जाहिराती वगळतात'
स्मृती यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - आज लोक या प्रकारच्या जाहिरातीमध्ये सहज काम करू शकतात. पण हो, मला आठवतंय की तेव्हा कुणासमोर बोलायलाही मनाई होती. म्हणूनच अशा प्रकारची अॅड करण्याच्या तुमच्या धाडसाचे मी कौतुक करतो. दुसरा चाहता म्हणाला- 'मला ही जाहिरात आठवते. पण त्या तुम्हीच आहात हे माहीत नव्हतं. तिसर्या यूजरने लिहिले- 'जर ही 25 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, तर हा जाहिरातीचा व्हिडिओ त्याच्या वेळेपेक्षा खूप पुढे आहे. याबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल तुम्हाला सलाम. आजही लोक असे व्हिडिओ वगळतात यावर माझा विश्वास आहे.
2000 मध्ये टेलिव्हिजन करिअरला सुरुवात
स्मृती इराणी एक मॉडेल राहिलेल्या आहेत, टीव्ही सीरियलमध्ये येण्यापूर्वी त्या अनेक अॅड शूटमध्ये दिसल्या आहेत. त्यांनी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्या अंतिम फेरीतही पोहोचल्या, पण विजेत्या होऊ शकल्या नाहीत. 2000 मध्ये, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'हम हैं कल आज कल और कल'मधून केली. मात्र, सास भी कभी बहू थी या टीव्ही मालिकेतून त्यांना देशभरात ओळख मिळाली. 2001 मध्ये झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या रामायणमध्ये स्मृती यांनी सीतेची भूमिका साकारली होती. 2006 मध्ये त्यांनी बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली 'थोडी सी जमीन' और 'थोडी सा आसमान' या टीव्ही शोमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले. 2008 मध्ये, त्या साक्षी तन्वरसोबत 'ये है जलवा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणूनही दिसल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.