आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Social Media Reactions After Shraddha Kapoor Name Surfaces In Drugs Case. Surprised Users Says On Social Media Wo Stri Hai Kuchh Bhi Kar Sakti Hai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर ट्रोल होतेय श्रद्धा कपूर, सोशल मीडिया युजर्स म्हणाले - 'वो स्त्री है, कुछ भी कर सकती है...'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्ज प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह श्रद्धा कपूरचे नावही समोर येत आहे. सूत्रानुसार, रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलेल्या निवेदनात या अभिनेत्रींचे नाव घेतले आहे. त्यानंतर एनसीबीने त्यांना समन्स पाठवले आहे.

ड्रग्ज प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. यामुळे सोशल मीडियावर तिचे नाव ट्रेंड होऊ लागले. यादरम्यान, युजर्सने तिच्याविषयी विविध कॉमेंट्स केल्या. काही युजर्सने तिचे समर्थन केले तर काहींनी मजेदार कॉमेंट्स करुन तिची खिल्ली उडविली.

‘दंगल’ चित्रपटामध्ये आमिरच्या डायलॉगच्या धर्तीवर एका युजरने शक्ती कपूरचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘म्हारी छोरियां, छोरों से कम है के’.

छिछोरेच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती श्रद्धा

नुकतेच एका मुलाखतीत सुशांतच्या फार्महाऊसचे केअर टेकर असलेल्या रईसने सांगितले, श्रद्धा कपूर ‘छिछोरे’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी सुशांतच्या फार्महाऊसवर गेली होती. श्रद्धाशिवाय चित्रपटाच्या बाकी कलाकारांनी लोणावळ्यातील पवना तलावाच्या काठावरील या फार्महाऊसला भेट दिली होती. रात्री 8 वाजेपर्यंत श्रद्धा तिथेच थांबली होती. इतर कलाकार रात्री अकरा वाजता मुंबईला रवाना झाले होते.

वो स्त्री है कुछ भी कर सकती है

एका युजरने श्रद्धावर कमेंट करत लिहिले..., ‘ड्रग प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने लोक चकित आहेत. मात्र त्यांनी विसरू नये... वो स्त्री है, कुछ भी कर सकती है.’ अशा प्रकारे श्रद्धाला ट्रोल केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...