आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब शोवर संताप:'तांडव'मध्ये भगवान शिवशंकराचा अपमान केल्याने भडकले सोशल मीडिया यूजर्स, म्हणाले - तुम्ही इतर धर्मांसोबत असे वागू शकता का?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तांडववर बहिष्कार टाका, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद झिशान अयूब, सुनील ग्रोव्हर आणि कृतिका कामरा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेली ‘तांडव’ ही वेब सीरिज शुक्रवारी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. मात्र, यासोबतच सोशल मीडियावर याला तीव्र विरोधही सुरू झाला आहे. भगवान शिवशंकराचा अपमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर केला जात आहे. सीरिजच्या माध्यमातून जेएनयूचे केलेले समर्थन, देवतांच्या तोंडी घातलेले वादग्रस्त संवाद यामुळे नेटक-यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

कसा झाला हिंदू देवतांचा अपमान?
सोशल मीडियावर या वेब सीरिजमधील एक सीन व्हायरल होतोय. पहिल्या 15 मिनिटांमध्ये अभिनेता झिशान आयुब हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा तरुण भगवान शिवशंकराच्या भूमिकेत वावरताना दिसतोय. त्याने यावेळी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.

सोशल मीडिया यूजर्सनी घेतले तोंडसुख
या वेब सीरिजच्या माध्यमातून एका वेगळ्या प्रकारचा प्रप्रोगंडा करण्याचे काम केले जात असल्याची टीका नेटक-यांनी केली आहे. तांडववर बहिष्कार टाका, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

आणखी एका यूजरने लिहिले, "द्वेष पसरवायचा नाही. मी हिंदू आहे आणि आम्ही खूप शांतताप्रिय लोक आहोत. पण या ओटीटी चित्रपटांची हिंदू धर्माची अवहेलना करायची हिंमत कशी झाली. हे लोक इतर धर्मांसोबत असे करु शकतात का?"

एका नेटक-यांने लिहिले, "डिअर प्राइम व्हिडिओ जेएनयूच्या टोळीला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही तांडववर किती पैसा खर्च केला? कृपया सर्जनशीलता आणि कलेच्या नावाखाली प्रचार थांबवा."

एका यूजरने लिहिले, "बॉलिवूड नेहमीच हिंदू धर्म आणि हिंदू देवतांना लक्ष्य का करतो, हे मला कळत नाहीये. आमचा देव, आमचा धर्म मनोरंजन करण्यासाठी नाही. ते इतर धर्मांसोबत असे करू शकतात (इस्लाम / ख्रिस्ती) का. हे लाजीरवाणे आहे.'

भगवान शंकराची भूमिका करुन अशोभनीय शब्दांचा वापर करणे हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा या मालिकेचा दिग्दर्शक अली अब्बास आणि मुख्य भूमिकेत सैफ अली खान असतो, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

बातम्या आणखी आहेत...