आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहेल खानचा 50 वा वाढदिवस:फिल्मी आहे सोहेलची लव्ह स्टोरी, कुटुंबीयांच्या विरोधामुळे सीमा सचदेवसोबत पळून जाऊन आर्य मंदिरात केले होते लग्न

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या लव्ह लाइफमुळे सोहेल चर्चेत असतो.

अभिनेता सलमान खानचा छोटा भाऊ सोहेलचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 20 डिसेंबर 1969 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. सोहेल हा देखील एक अभिनेता असून तो सलमान खानसह 'ट्यूबलाइट' या चित्रपटात झळकला होता. याशिवाय 'लव्हयात्री' आणि 'दबंग 3' मध्येही त्याचा स्पेशल अपिअरन्स होता. अभिनेता म्हणून सोहेलचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी राहिले नाही, मात्र आपल्या लव्ह लाइफमुळे तो चर्चेत असतो.

सोहेलचे लग्न सीमा सचदेवसोबत झाले आहे. सीमा अलीकडेच नेटफ्लिक्सची वेब सीरिज फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्ज या सीरिजमध्ये झळकली असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत
आहे. सीमा आणि सोहेलची प्रेमकथा अगदी फिल्मी आहे. एक नजर टाकुया दोघांच्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीवर...

सोहेलने पळून जाऊन केले होते लग्न
सीमा मुळची दिल्लीची आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. दरम्यान सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट झाली. सोहेलच्या म्हणण्यानुसार, तो पहिल्या नजरेतच
सीमाच्या प्रेमात पडला होता. लवकरच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. या जोडप्याला लग्न करायचे होते. परंतु या लग्नासाठी सीमाचे कुटुंब तयार नव्हते.

म्हणूनच सीमा आणि सोहेल यांनी मोठा निर्णय घेतला. ज्या दिवशी सोहेलने दिग्दर्शित केलेला 'प्यार किया तो डरना क्या' (1998) हा चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी दोघांनी पळून जाऊन आर्य
समाज मंदिरात लग्न केले. नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे नाते स्वीकारले. या जोडप्याने निकाहदेखील केला. निर्वाण खान आणि योहान खान ही सोहेल-सीमाच्या मुलांची नावे आहेत.

फॅशन डिझायनर आहे सीमा
लग्नानंतर सोहेलने सीमा बरोबर एंटरटेन्मेंट बिझनेस सुरु केला. सीमा टीव्ही शो आणि चित्रपटांची आघाडीची फॅशन डिझायनर बनली. टीव्ही सीरियल 'जस्सी जैसी कोई नहीं' (2003-07) मधील
कलाकारांचे कॉश्च्युम सीमाने डिझाइन केले होते. या मालिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली होती.

सीमाचे 'बांद्रा 190' नावाचे बुटीक आहे. ती सुझान खान आणि महिप कपूर सोबत मिळून हे बुटीक चालवते. याशिवाय सीमाचा मुंबईत ब्युटी स्पा आणि 'कालिस्ता' नावाचा सलून आहे.

सोहेलने दिग्दर्शक म्हणून केली होती करिअरची सुरुवात
सोहेलने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. संजय कपूर, सलमान खान आणि शिल्पा शेट्टी स्टारर 'औजार' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. त्यानंतर त्याने भाऊ
सलमानचा 'प्यार किया तो डरना क्या' (1998) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

हाच तो चित्रपट आहे ज्याने त्याला इंडस्ट्रीमध्ये फिल्म मेकर म्हणून ओळख मिळवून दिली. अभिनय करिअरविषयी बोलायचे म्हणजे सोहेलने 2002 मध्ये 'मैंने दिल तुझको दिया'पासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. सोहेल आतापर्यंत 'डरना मना है', 'लकीर', 'मैनें प्यार क्यों किया', 'फाइट क्लब', 'सलाम-ए-इश्क', 'हिरोज', 'हॅलो', 'आर्यन' आणि 'कृष्णा कॉटेज' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

.

बातम्या आणखी आहेत...