आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्सरशी लढा देतेय राखीची आई:राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडिओ शेअर करत म्हणाला - आईच्या उपचारांसाठी कुठलीही मदत लागली तर मला फोन कर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोहेलचा हा व्हिडिओ राखीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

‘बिग बॉस 14’ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंतची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. राखीची आई जया यांच्यावर उपचारांसाठी मदत करण्यासाठी सलमान खाननंतर आता त्याचा भाऊ सोहेल खान पुढे आला आहे. सोहेलने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करत राखीच्या आईच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. सोबतच कुठलीही गरज लागली तर मला फोन कर, असेही सोहेलने राखीला म्हटले आहे. सोहेलचा हा व्हिडिओ राखीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'जगातील माझे सर्वात बेस्ट भाऊ, सोहेल आणि सलमान...'

कुठलीही गरज लागली तर मला सरळ फोन कर
सोहेल खान या व्हिडिओमध्ये राखीला म्हणत आहे, 'माय डिअर राखी, तुला आणि तुझ्या आईला कुढल्याही प्रकारची गरज लागत असेल तर, तू सरळ मला फोन कर…मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या आईला भेटलो नाही पण मला हे नक्की माहिती आहे की, राखी स्ट्राँग आहे मग तुझी आईही तुझ्यापेक्षाही स्ट्राँग असणार…मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल आणि सर्व व्यवस्थित होईल,' असे सोहेल म्हणाला.

राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर करुन प्रियजनांना तिच्या आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, 'प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे.'

याशिवाय राखीने सोशल मीडियावर आईचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात राखी आणि तिची आई जया सलमान आणि सोहेल यांचे आभार व्यक्त करताना दिसल्या होत्या. या व्हिडिओत राखीच्या आईने सलमान आणि सोहेल या दोघांचेही आभार मानले. 'माझी किमोथेरपी सुरु आहे. चार किमो झाले असून आणखी दोन बाकी आहेत. सलमान आणि सोहेल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवाोत आणि तुम्ही सुखी-समाधानी राहा,' असे राखीची आई जया व्हिडिओत म्हणाल्या.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’च्या 14 व्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. या शोमध्ये अभिनेत्री राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एन्ट्री घेतली आणि टॉप 5 स्पर्धकांमध्ये मजल मारली. मात्र शेवटच्या क्षणी राखीने 14 लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिने तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे सांगून हे पैसे आईच्या उपचारांसाठी वापरणार असल्याचे ती म्हणाली. फिनालेमध्ये सलमान खानने देखील तिच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

बातम्या आणखी आहेत...