आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
1998 मध्ये आजच्या दिवशी रिलीज झालेला अॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘सोल्जर’चे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. यात मुख्य भूमिकेत बॉबी देओल, प्रीती झिंटा, दलीप ताहिल, सुरेश ओबरॉय, पंकज धीर आणि शरत सक्सेना होते. चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जाणून घेऊ काही महत्त्वाच्या बाबी...
पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटाचे ऑस्ट्रेलियात शूटिंग झाले - दलीप ताहिल, अभिनेते
22 वर्षांनंतरही आयकॉनिक सोल्जर चित्रपटाविषयी बोलले जात आहे, याला मी माझे सौभाग्य समजतो. त्यात मी सहभागी होतो. पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रेलिया येथील सिडनी हाबर, बाउंटी शिपवर करण्यात आले होते. यापूर्वी येथे कोणत्याही बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग झाले नव्हते. येथे हॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. येथे एक दिवस जहाज बूक करुन माझा बंगला आणि मृत्युच्या दृश्याची पूर्ण शूटिंग करण्यात आली होती. मस्तानभाईने माझ्या पात्राविषयी सांगितले होते, एक भोजपूरी माणूस आहे, तो येथून ऑस्ट्रेलियाला जातो, तेथे खूप दौलत कमवतो, मात्र बोलण्याची पद्धत तीच राहते. मी ही भूमिका साकारली होती. असो, त्याकाळात पत्रकार परिषदेत मला करिश्मा कपूर, मनीषा कोइराला, आमिर खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, काजोल यांचे उदाहरण देऊन विचारू लागले की, तुम्ही ज्या हिरो-हिरोइनच्या पहिल्या चित्रपटात असता तो चित्रपट हिट होतो. मी म्हणालो, मी असा विचारही करत नाही, हे माध्यमांचे म्हणणे आहे, यात माझे योगदान नाही.
सोल्जरचे लोकेशन खूपच चांगले होते - रमेश तौरानी. निर्माते
सोल्जरचे दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी मला कथा ऐकवली होती. तेव्हा आपल्याला बॉबी देओलला घ्यायला हवे, असे मी त्यांना सुचवले. कारण त्यावेळी ते मोठे आणि देखणे स्टार होते. त्यावेळी त्यांनी ’बरसात’ आणि ’गुप्त’ सारखे चित्रपट केले होते. एकदा बॉबी देओलची कास्टिंग निश्चित झाल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडले. असो, ‘सोल्जर’ आधी बॉबी देओलचे दोन मोठे चित्रपट ‘और प्यार हो गया’ आणि ‘करीब’ फ्लॉप झाले होते. तरीदेखील आम्ही चित्रपट रिलीज केला आणि सुदैवाने हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जैसलमेर आणि मुंबईत केले होते. याच्या कथेत आणि क्लायमेक्समध्ये बदल करण्यात आला नव्हता. सेन्सॉर बोर्डानेदेखील यात कात्री लावली नाही. बॉक्स ऑफिसवर आणि विदेशातही चित्रपटाने चांगली कमाई केली.
सोल्जरनंतर लोक बॉबीची हेअर स्टाइल कॉपी करू लागले होते
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.