आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायक आणि संगीतकार बी प्राक आणि त्यांची पत्नी मीरा बच्चन यांनी त्यांचे दुसरे बाळ कायमचे गमावले आहे. त्यांच्या नवजात बाळाचा जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झाला. खरं तर दोघेही त्यांच्या दुस-या मुलाबद्दल खूप उत्सुक होते. बुधवारी मीरा यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काही तासांतच त्याची प्राणज्योत मालवली. ही माहिती देताना प्राकने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली होती.
बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या मुलांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोलमडले होते.
अनुराधा पौडवाल
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना त्यांचा 33 वर्षांचा मुलगा आदित्य याच्या मृत्यूने धक्का बसला होता. 2020 मध्ये किडनीच्या आजारामुळे आदित्यचा मृत्यू झाला होता.
आशा भोसले
गायिका आशा भोसले यांची मुलगी वर्षा भोसले हिने 2012 मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये होती, असे म्हटले जाते. यापूर्वीही वर्षाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
शेखर सुमन
बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यानेही त्याचे मुल गमावले आहे. शेखरचा मुलगा आर्यन 11 वर्षांचा असताना हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर शेखर बराच काळ अभिनयापासून दूर राहिला होता.
जगजित सिंग
प्रसिद्ध गझल गायक जगजीत यांनी 1990 मध्ये त्यांचा मुलगा एका अपघातात गमावला. यानंतर 2009 मध्ये त्यांच्या मुलीने आत्महत्या केली होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूचा जगजीत यांना खूप मोठा धक्का बसला होता, त्यामुळे त्यांनी गझल गाणे सोडून दिले होते. काही काळाने लोकांनी समजावल्यानंतर त्यांनी पुन्हा गाणे सुरू केले होते.
कबीर बेदी
या यादीत कबीर बेदी यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्या मुलाने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली. त्यांचा मुलगा सिद्धार्थ डिप्रेशनने त्रस्त होता.
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिनने 4 विवाह केले होते. त्यांना 11 मुलेही होती. चार्ली यांचे पहिले मूल जन्मानंतर तीन दिवसांनी मरण पावले. मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता.
प्रकाश राज
बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते प्रकाश राज यांनी 2004 मध्ये त्यांचा 5 वर्षांचा मुलगा गमावला होता. पतंग उडवताना त्यांचा मुलगा एक फूट उंचीच्या टेबलावरून पडला होता. काही महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला होता.
सिल्वेस्टर स्टॅलोन
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत् सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या मुलाचे 2012 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिल्वेस्टरला आपल्या मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता. भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे पिंडदान हरिद्वारमध्ये केले होते.
मौसमी चॅटर्जी
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनीही आपल्या मुलीच्या मृत्यूचा धक्का पचवला आहे. त्यांच्या मुलीचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले होता. मौसमी यांची मुलगी पायलला मधुमेहाचा त्रास होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.