आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये सोमी अलीने सलमान खानसोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. पण सोमीने आपली ही पोस्ट लगेच डिलीटदेखील केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये सोमीने सलमान खान व्यतिरिक्त त्याला पाठिंबा देणा-या अभिनेत्रींवरही निशाणा साधला आहे. सोमीने सलमानवर तिचा केवळ शो बंद केला नाही, तर तिच्यावर केस करण्याची धमकीही दिल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर तिने सलमाचे नाव न घेता त्याच्यावर सिगारेटचे चटके दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे. सोमी अली एकेकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. अलीकडच्या काळात ती अनेकदा सलमान खानवर निशाणा साधताना दिसतेय.
मी माझ्या बचावासाठी 50 वकील उभे करणार आहे
सोमीने नुकताच सलमानसोबतचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले- 'आता आणखी काही गोष्टी समोर येतील. भारतात माझा शो बंद केला, माझ्यावर खटला दाखल करण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस, तुझ्या वकिलाला काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे 50 वकील आहेत, तू अनेक वर्षे माझे शारीरिक शोषण केलं, मला सिगारेटचे चटके दिले,' असे सोमीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.
त्याची साथ देणा-यांची लाज वाटते
सोमीने तिच्या पोस्टमध्ये काही शिव्यांचाही उल्लेख केला आहे. त्याशिवाय अशा काही अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे, ज्यांनी सलमानला सपोर्ट केला आहे. सोमीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाला सपोर्ट करणाऱ्या त्या सर्व महिला कलाकारांची मला लाज वाटते.
सलमानवर यापूर्वीही केले होते आरोप
2022 च्या मार्च महिन्यात सोमीने अप्रत्यक्षपणे सलमान खानवर निशाणा साधला होता आणि त्याच्यावर अनेक आरोप केले होते. सोमीने सलमानला बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन म्हटले होते. हॉलिवूड अभिनेता हार्वे वाइनस्टीन याच्यावर अनेक महिला आणि अभिनेत्रींना धमक्या देण्याव्यतिरिक्त बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप आहे, याचा संदर्भ देत सोमी म्हणाली होती, 'बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल. ज्या महिलांना तू मारहाण केलीस, त्या महिला एक दिवस सर्वांसमोर येतील आणि ऐश्वर्या रायप्रमाणे सत्य सांगतील,' असे तिने म्हटले होते.
ऐश्वर्यामुळे तुटले होते सलमान आणि सोमीचे नाते
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सलमान हा तिचा पहिला बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले होते. मात्र ऐश्वर्या रायमुळे त्यांचे नाते तुटले. सोमीचे सलमानवर खूप प्रेम होते, सलमानवरच्या एकतर्फी प्रेमापोटी ती फ्लोरिडाहून अगदी लहान वयात भारतात आली होती. पण सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्याची एन्ट्री झाल्यानंतर सोमीसोबतचे त्याचे नाते संपुष्यात आले होते.
सलमानसोबत होऊ शकला नव्हता पहिला चित्रपट
फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सांगितले होते की, तिचा डेब्यू चित्रपट 'बुलंद' सलमानसोबत होणार आहे. दोघेही शूटसाठी नेपाळला गेले होते, पण निर्मात्यांशी झालेल्या मतभेदांमुळे शूटिंग थांबले आणि चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.