आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थ्रोबॅक व्हिडिओ:मुलगा बाबिलने इरफानचा पाणीपुरी खातानाचा जुना व्हिडिओ केला शेअर, चाहते झाले इमोशनल

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका चाहत्याने लिहिले आहे की, ते आपल्या आठवणीत कायमच राहतील.

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता इरफान खानच्या मृत्यूला चार दिवस उलटून गेले आहेत, पण तो या जगात नाही यावर अद्याप विश्वास ठेवणे त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना अजूनही कठीण जात आहे. प्रत्येकजण त्याच्या आठवणींनी वेडलेला आहे. त्याचा मुलगा बाबिल याच्या बाबतीतही असेच घडले आहे. बाबिलने नुकताच इंस्टाग्रामवर इरफानचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पाणी पुरीचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना बाबिलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि शूट संपल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाता..’ 

चाहते झाले इमोशनल : व्हिडिओ पाहिल्यानंतर इरफानचे चाहते भावूक झाले आहेत. इरफान खान आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही, अशा शब्दांत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.एका चाहत्याने लिहिले की, एका सेकंदासाठी मला असे वाटले की, इरफान इथेच आहे. त्याला काहीही झाले नाही. सुतापाजी, तुम्हाला आणि अयानला खूप प्रेम... आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, ते आपल्या आठवणीत कायमच राहतील.

29 एप्रिल रोजी झाले निधन: इरफानने 29 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते.

न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरने पीडित होता इरफान : मार्च 2018 मध्ये इरफान खान न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला गेला होते. तेथे जवळपास वर्षभर त्याच्यावर उपचार झाले आणि बरे झाल्यानंतर तो एप्रिल 2019 मध्ये भारतात परतला होता. आजारातून बरे वाटल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते.  हाच त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. 

बातम्या आणखी आहेत...