आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलिंग:बॉडी शेमिंग आणि ट्रोलला बळी पडल्यानंतर सोना महापात्रा म्हणाली- 'मी आतून खूप खचून जाते'  

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मी पर्वा करत नाही.

आपले रोखठोक मत मांडणारी गायिका सोना महापात्रा सोशल मीडियावर बर्‍याचदा ट्रोल होत असते. अलीकडेच तिने दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती कशाप्रकारे ट्रोलर्सचा सामना करते हे सांगितले.

लोकांच्या मनात खरोखर इतका द्वेष आहे का?

मी जेव्हा जेव्हा माझे काही विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडते तेव्हा बरेच लोक मला ट्रोल करतात. मला असे वाटते की कोणताही मनुष्य एवढा इम्युन नसतो की त्याला त्रास होणार नाही. मी अनेकदा आतून खचून जाते आणि विचार करते की, लोकांच्या मनात खरोखरच इतका द्वेष आहे की ते मला जिवे मारण्याची धमकी देऊ शकतात?

रंगोलीने मला  मला 2 वर्षे ब्लॉक केले 

कंगना रनोटची बहीण रंगोलीने जवळजवळ 2 वर्षे ट्विटरवर मला ब्लॉक केले होते. ती ट्विटरवर माझ्याबद्दल काय लिहित आहे याची खरंच मला कल्पना नव्हती. पण मला नेहमीच असं वाटतं की जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला ट्रोल करते,  तुमचा अपमान करतात, तुमच्या स्वाभिमानाला दुखावते तर तिच्याविरोधात तुम्ही आवाज उठवायला हवा आणि मी नेहमी असेच करते.

माझ्या वजनामुळे ब-याचदा लोकांना त्रास होतो

न्यू ईयरच्या निमित्ताने मी स्विमिंग कॉस्ट्यूममधला एक फोटो ठेवला होता, त्यानंतर ट्विटरवर लोकांनी बॉडी शेमिंग आणि ट्रोल केले. अखेर कोणालाही माझ्या वजनावर कमेंट करण्याचा हक्क कुणी दिला? मी स्वतःच्या कष्टाने मिळवलेले अन्न खाते, मग लोकांना इतका त्रास का होतो? जर त्यांना खूप त्रास होत असेल तर त्यांनी मला फॉलो करणे बंद करावे, हे लोक माझ्या शरीरावर भाष्य करणारे कोण आहेत. 

लोक काय विचार करतात याची काळजी करत नाही

लोकांनी आपले डोळे बंद केले पाहिजेत, पण एखाद्या व्यक्तीने त्याचे आयुष्य कसे जगायचे ते तुम्ही सांगू शकत नाही. मी नेहमी माझ्या स्वाभिमानासाठी उभे राहते. मी स्वत:ला स्लिम दाखवण्याचा प्रयत्न करत नाही  किंवा मी कोणतेही फिल्टर लावलेले नाही. मी जशी आहे, तशीच दिसते. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मी पर्वा करत नाही. पूर्वी बघितले तर नायिका किती सुंदर असायची, आज मात्र जग झिरो फिगरमागे धावत आहे. त्याकाळी नायिका निरोगी असायची झिरो फिगर नव्हे

स्वतःसाठी वजन कमी करणार

मला स्वतःसाठी वजन कमी करायचे आहे. कारण एखाद्या कॉन्सर्टमध्ये 3 ते 4  तास उभे रहावे लागते.  कुणी म्हणतं म्हणून नाही तर स्वतःच्या आनंदासाठी मी वजन कमी करणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...