आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोरासमोर:मद्य खरेदीसाठी रांगेत लागलेल्या महिलांना बघून राम गोपाल वर्मांचे खोचक ट्विट, सोना महापात्राने सुनावले रामूंना खडे बोल

    मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर रांगेत लागलेल्या महिलांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

देशभरात लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात 4 मेपासून कंटेनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी (4 मे) मद्यविक्रीच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.  दुकानांबाहेर मद्य खरेदीसाठी लोकांनी रांगा लावलेल्या दिसल्या. यात पुरुषांसोबत महिलांचाही समावेश होता. सोशल मीडियावर रांगेत  लागलेल्या महिलांचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र महिलांची ही गर्दी पाहिल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी महिलांना उद्देशून एक खोचक ट्विट केले. ते पाहिल्यानंतर गायिका सोना महापात्रा त्यांच्यावर भडकली असून त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

सोना महापात्राने सुनावले खडे बोल 

रामगोपाल वर्मांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले,  'पाहा, मद्यविक्रीच्या दुकांनांपुढील रांगांमध्ये कोण उभे आहे. या त्याच महिला आहेत. ज्या मद्यविक्रीवर बंदी घालण्यासाठी आवाज उठवत असतात.'  त्यांचे ट्विट पाहून सोनाने रामू यांना सडेतोड उत्तर दिले. "राम गोपाल वर्मा तुम्हालादेखील एका रांगेत उभे राहण्याची गरज आहे, ती रांग म्हणजे जेथे शिस्त शिकवली जाते. तुम्ही ज्या पद्धतीचं ट्विट केले आहे, त्यामुळे स्त्री-पुरुष भेदभावाला चालना मिळते. महिलांनादेखील पुरुषांप्रमाणेच दारु खरेदी करण्याचा हक्क आहे. मात्र मद्यपान केल्यानंतर कोणालाही चुकीचे वर्तन करण्याचा अधिकार नाही', अशा कडक शब्दांत सोनाने रामगोपाल वर्मांना सुनावले आहे. 

यूजर्सनीही केले रामूंना लक्ष्य : या ट्विटवर केवळ सोनानेच नव्हे तर सोशल मीडिया यूजर्सनीही रामू यांना लक्ष्य केले आहे.  एका यूजरने लिहिले, 'यांचे ऐका , त्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी महिला मद्यपान करते तर ती तिच्याबरोबर गैरवर्तन करता येते'.  दुस-या यूजरने लिहिले, 'मिस्टर वर्मा, तुम्हाला असे म्हणायचे आहे की ज्या स्त्रिया मद्यपान करतात त्यांनी पुरुषांकडून छळ झाल्यास तक्रार करू नये? केवळ असुरक्षित व्यक्तीच असा निकृष्ट तर्क देऊ शकते.'

बातम्या आणखी आहेत...