आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. दबंग या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर ती राउडी राठोड, आर राजकुमार, कलंक, अकिरा यांसारख्या चित्रपटात झळकली. 2010 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी सोनाक्षी अनेकदा वादातही अडकली आहे. चला तर मग आज सोनाक्षीशी संबंधित वादांवर एक नजर टाकुया...
KBC-11 मध्ये चुकीचे दिले होते उत्तर
2019 मध्ये सोनाक्षी KBC-11 मध्ये शोचे खास पाहुण्या कर्मवीर रुमाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती, त्यादरम्यान होस्ट अमिताभ यांनी सोनाक्षीला प्रश्न विचारला होता की, रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती? ज्याचे उत्तर लक्ष्मण असे होते. सोनाक्षीच्या घराचे नावही तिच्या वडिलांनी रामायण असे ठेवले आहे आणि तिच्या दोन्ही भावांची नावं लव-कुश आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिच्याकडून योग्य उत्तराची अपेक्षा होती, परंतु सोनाक्षीला या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते आणि यासाठी तिने तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यानंतर अमिताभ यांनीही सोनाक्षीची खिल्ली उडवली आणि उत्तर न देता आल्याने तिनेट्रोलिंगचा सामना केला होता.
घराणेशाहीवरून वादात सापडली होती सोनाक्षी
2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही सोनाक्षीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याने सोनाक्षीला लोकांनी ट्रोल केले होते, त्यानंतर सोनाक्षीने ट्विटरला रामराम ठोकला होता.
रीना रॉयसारखी दिसत असल्याने झाली होती ट्रोल
शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाचा चेहरा अभिनेत्री रीना रॉयशी साधर्म्य साधणारा आहे. खरं तर एकेकाळी शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सोनाक्षीचा पहिला चित्रपट 'दबंग'च्या रिलीजच्या वेळी, ट्रोलर्सनी तिच्या लूकची रीना रायशी तुलना केली आणि तिला रीनाची मुलगी देखील म्हटले. कुटुंबीयांनी मात्र याचा इन्कार केला. आजही सोशल मीडियावर रीना आणि सोनाक्षी यांच्या सारख्या लूकची अनेकवेळा चर्चा होत असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.